TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन

पुणे ः पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच, या मागणीसाठी पुण्यातील शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

पुण्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबविण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. तसेच, या मागणीसाठी पुण्यातील शास्त्री रस्त्यावर विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शिवाय, विद्यार्थ्यांकडून जोरदार घोषणाही दिल्या जात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या एमपीएससीच्या विविध पदांच्या परीक्षेतील मुख्य परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपात न घेता वर्णनात्मक स्वरुपात घेण्याचा निर्णय पुढील वर्षापासून घेण्यात आला आहे. मात्र, या परीक्षेच्या बदलास एमपीएससीच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवत सोमवारी सकाळच्या सुमारास पुण्यातील शास्त्री रोडवरील अहिल्यादेवी अभ्यासिके समोरील रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले.

यावेळ जवळपास ७०० ते ८०० विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या दिल्याचे दिसून आले. शिवाय, आयोगाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केली. तसेच, अचानक सुरू झालेल्या विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली.

पुण्याच्या शास्त्री रस्त्यावर आंदोलन करत असताना या विद्यार्थ्यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विद्यार्थी राज्यसेवा परीक्षेची तयारी करत आहोत. तसेच, परीक्षेची तयारी करत असताना अचानक आयोगाकडून २०२३ पासून तुमच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येत असल्याचा आदेश काढला जातो. मात्र, आयोगाचा हा निर्णय आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आयोगाने २०२५ मध्ये तो नियम लागू करावा अशी आमची राज्य सरकारकडे मागणी आहे.

राज्य सरकार अनेक निवडणुका पुढे घेत जात आहे. त्यामुळे आमचा अभ्यासक्रमाचा निर्णय २०२५ पासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारला सहज शक्य आहे. त्यामुळे राज्य सरकारने विद्यार्थ्यांचा विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील विद्यार्थ्यांनी यावेळी दिला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button