breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराजकारण

‘हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर..’;  देवेंद्र फडणवीसांचा जोरदार टोला

अकोला : लाडकी बहीण योजनेने विरोधकांना घाम फोडल्याचा आरोप महायुतीकडून करण्यात येत आहे. या योजनेमुळे महाविकास आघाडीचे आवासान गळ्यालाचा दावा सत्ताधारी गोटातून करण्यात येत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. हे सावत्र भाऊ लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलतात आणि फॉर्मवर स्वतःचे थोबाड लावतात, असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे. अकोला येथे ते बोलत होते.

रणधीर भाऊंनी मला सांगितले एक दीड तास बोला. मी जर प्राध्यापक असतो तर नक्कीच 50 मिनिट बोललो असतो.माझी सवय आहे मोजकच बोलायचं आवश्यक आहे तेवढंच बोलायचं. अकोला बद्दल अनेक जण शंका व्यक्त करत होते. पण तूम्ही विजयाची परंपरा इथे कायम ठेवली, असे कौतुक त्यांनी केले.

पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत आपला सामना महाविकास आघाडीच्या तीनच पक्षासोबत नाही तर चौथ्या म्हणजे खोट बोलणाऱ्या सोबत झाला.खोटा नेरेटीव्ह हा 3 वर्षापासून सुरू झाला त्यात काही तथाकथीत पत्रकार देखील आहेत. 400 पार झाले तर आरक्षण जाणार संविधान बद्दलवणार असा खोटा प्रचार केला. 50 वर्षांनंतर आरक्षण वाढवल ते अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं, असे ते म्हणाले.

हेही वाचा –  मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं की नको? अजित पवार म्हणाले

आता खोटा प्रचार त्यांनी केला. एक खोटा नेरेटीव्ह मुस्लिम समाजात देखील पसरवण्यात आला होता.. आपल्या जागा कमी झाल्या हे खरं आहे.पण आपले मत कमी झालं नाही.यांच्यापेक्षा फक्त आपल्याला 2 लाख कमी मत मिळाले.  12 जागा भाजपच्या 3 टक्के मतांनी पडल्या. याच उदाहरण घ्यायचे तर धुळेचे आहे. अतिशय कमी मतांनी आपण निवडणूक हरलो. जे खोट असतं त्याच वय छोटं असतं, असं ते म्हणाले.

लाडक्या बहिनीचा त्रास आता मविआला होऊ लागला. ते कोर्टात गेले. तुम्ही सोन्याचा चमचा घरून जन्माला आले पण 1500 रुपयांचे महत्व आमच्या गृहिणीला विचारा. पण आमच्या बहिणीच्या लक्षात आलं की हे सावत्र भाऊ आहे. यांच्यापासून सावधं राहिलं पाहिजे. सप्टेंबरमध्ये आपण बहिणीला हप्ता देणार आहोत. शेतकऱ्यांना 365 दिवस आम्ही दिवसाची वीज देणार आहोत. काँग्रेसची ही लबाड योजना नाही आहे. पुढची पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचे बिल येणार नाही, असा दावा त्यांनी केला. गेल्या 3 महिन्यात वातावरण बद्दले आहे. असे ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button