नाना पटोलेंसाठी मंदिर उघडले, मात्र भाजपा माजी आमदारांना बाहेर रोखले
![The temple was opened for Nana Patel, but the BJP stopped the former MLAs from leaving](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Nana-Patole.jpg)
भंडारा – जिल्ह्यातील चांद्रभट्टी देवस्थानचे हनुमान मंदिर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या महापूजेसाठी उघडण्यात आले. त्यांना थेट गाभाऱ्यात प्रवेश देण्यात आला. मात्र भाजपाचे माजी आमदार चरण वाघमारे हे महाआरतीसाठी या मंदिरात गेले असता त्यांना मात्र मंदिर प्रवेशबंदीचा नियम पुढे करत पायऱ्यांवरच रोखण्यात आले. यावर संतप्त झालेल्या वाघमारे यांनी पटोलेंनी महापूजा केली, मग सर्वसामान्यांनाच मंदिरे बंद का केली जात आहेत असा सवाल केला.
माजी आमदार चरण वाघमारे यांनी असेही म्हटले आहे की, मंदिरे उघडण्याची आमची मागणी आहेच पण सरकार त्यांच्या नेत्यांसाठी कायदे धाब्यावर बसवीत आहे. आधी भास्कर चव्हाण यांच्या मुलांनी मंदिरात जाऊन अभिषेक केला. त्यानंतर आता नाना पटोले यांनी थेट गाभाऱ्यात जाऊन महापूजा केली. दरम्यान, याबाबत पोलिसांनी हा निर्णय जिल्हा प्रशासनाचा असल्याचे सांगितले, तर जिल्हाधिकारी मात्र प्रतिक्रिया देण्यास उपलब्ध होऊ शकले नाहीत.