Viral Video : पाप-पुण्याचं मोजमाप आलं अंगलट, खांबांमध्ये अडकले भाजप आमदार
![The measure of sin and punishment has come to an end, BJP MLAs are stuck in the pillars](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/bjp-mla-Viral-Video-780x470.jpg)
Viral Video : मध्य प्रदेशच्या रतलामच्या प्रसिद्ध गुणावद गावातील डोंगरावर हिंगलाज माता आणि महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात दोन जुने मोठे स्तंभ आहेत. ज्यांना पाप-धर्माचे खांब म्हटलं जाते. या दोन्ही खांबांमधील अंतर अत्यंत कमी आहे. त्यामुळेच, या दोन्ही खांबाच्या मधून जी व्यक्ती बाहेर निघू शकते ती पुण्यवान आणि जो त्यातून निघू शकत नाही तो पापी असं मानलं जातं. दरमायन, याच पाप-पुण्याचं मोजमाप भाजप आमदाराच्या अंगलट आलं आहे.
मध्य प्रदेशच्या रतलाम जिल्ह्यातील रतलाम ग्रामीण मतदारसंघाचे आमदार दिलीप मकवाना हे दोन खांबांच्या मध्ये अडकले होते. भाविक बनून देवीच्या मंदिरात मनोकामना पूर्तीसाठी त्यांनी दोन स्तंभातून बाहेर येण्याच्या प्रथा-परंपरेचं अनुकरण केलं. मात्र, त्यावेळी, दोन्ही खांबाच्या मध्ये ते अडकून पडले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सुदैवाने, आमदार दिलीप मकवाना हे या दोन्ही खांबाच्या मधून सुखरुपपणे बाहेर आले.
हेही वाचा – शिरूर लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याने थोपटले दंड?
व्हायरल झालेला व्हिडीओ सुमारे दोन वर्ष जुना असल्याचं बोललं जात आहे. जिथे आमदार दिलीप मकवाना त्यांच्या सहकाऱ्यांसह मंदिरात दर्शनासाठी पाहोचले होते. येथे पूजा केल्यानंतर त्यांनी खांबाच्या मधून जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा उपस्थितांनी त्यांना हा व्हिडीओ बनवला.