breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कोविडची तपासणीसाठी खासगी यंत्रणेची मदत

  • जनुकीय तपासणी आरटीपीसीआर करण्यास मर्यादा

पालघर |

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत असून करोना संसर्ग झालेल्या नागरिकांच्या जोखीम संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीवर प्रशासन भर देणार आहे. असे असताना जनुकीय तपासणी आरटीपीसीआर करण्यास मर्यादा येत असून त्यामुळे जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांची मदत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पालघर जिल्ह्यामध्ये सध्या डहाणू येथील ‘मॉडेल रुरल हेल्थ रिसर्च युनिट’ या केंद्रामध्ये सद्य:स्थितीत शंभर जुनकीय नमुने तपासली जात असून मुंबई येथील हॅफकिन इन्स्टिट्यूटमध्ये २०० तसेच आईसीएमआरच्या परळ केंद्रात १०० नमुने तपासले जात आहेत. पूर्वी मुंबईमध्ये तपासल्या जाणाऱ्या नमुन्यांची संख्या पाचशेपेक्षा अधिक होती.

मात्र राज्यातील अन्य भागात रुग्णसंख्या वाढल्याने मुंबई मधील शासकीय व्यवस्थेत पालघर जिल्ह्यातील फक्त ३०० ते ४०० जूनकीय नमुन्यांची तपासणी होऊ शकते अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील वाढता संसर्ग पाहता अडीचशेहून अधिक तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. पालघर जिल्ह्यात जनुकीय तपासणी क्षमता वाढवण्यासाठी डहाणू येथील वेदांत रुग्णालय येथे दररोज दीडशे नमुन्यांची तपासणी करण्याची व्यवस्था उभारण्यात आली आहे. या खासगी रुग्णालयाने ही तपासणी विनामूल्य करून देण्याचे मान्य केले असून तपासण्यासाठी लागणारी सामग्री, रसायने व इतर साधने साहित्य पुरविण्यात यावे याकरिता वैद्यकीय विभागाकडे जिल्हा प्रशासनाने मागणी केली आहे.

वाचा- पुणे शहराचे दोन लसीकरण महिन्यात पूर्ण होईल’, महापौरांना विश्वास

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button