breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदेश-विदेशराजकारण

१८व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन आजपासून सुरू; २८० खासदार घेणार शपथ

Loksabha Session 2024 | लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर देशात सलग तिसऱ्यांदा एनडीए सरकार सत्तेत आलं आहे. त्यानंतर ९ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे.

अशातच आजपासून १८ व्या लोकसभेच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. तसेच आज खासदारांचा शपथविधी सोहळा देखील पार पडणार आहे. पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व कॅबिनेट मंत्र्यांसह २८० खासदार शपथ घेणार आहेत.

हेही वाचा     –      ‘संतांच्या अनुकरणाने काम करतं राहिल्यास समाज त्यांच्या माघे उभा राहतो’; खासदार श्रींरंग बारणे 

आज सकाळी ११ वाजता लोकसभेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहेत. तर सकाळी ११ ते १ या वेळेत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. तसेच मंगळवारी उरलेल्या २९ खासदारांचा शपथविधी सकाळी ११ ते १२ या वेळेत होणार आहे.

प्रोटेम स्पीकर इतर सदस्यांना शपथ देण्याचं काम करणार आहेत. तर अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्षांची निवड २६ जून रोजी होणार असून २७ जून रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button