“दिवस तुमचा, मैदान तुमचं, वेळ तुमची, कुठं येऊ सांगा?”, मनसे नेत्याचं खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान

“दिवस तुमचा, मैदान तुमचं, वेळ तुमची, कुठं येऊ सांगा?”, मनसे नेत्याचं खासदार निशिकांत दुबेंना खुलं आव्हान

Raj Thackeray : राज्यात हिंदी भाषा आणि मराठी विरुद्ध अमराठी अशा मुद्यांवरून राजकारण तापलं आहे. काही दिवसांपूर्वी मिरा भाईंदरमध्ये झालेल्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्यांवरून व्यापाऱ्यांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यानंतर शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा मिरा भाईंदरमध्ये पार पडली. या सभेत बोलताना राज ठाकरे हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आणि मराठी विरुद्ध अमराठी या मुद्यांवरून चांगलेच आक्रमक झाले होते.

यावेळी राज ठाके यांनी भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. ‘दुबे… तुम मुंबई में आ जावो…मुंबई के समंदर में डुबे डुबे कर मारेंगे’ असं राज ठाकरे यांनी म्हटलं. त्यांच्या या विधानानंतर खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा ट्विट करत डिवचलं होतं. दरम्यान, यानंतर आता मनसेचे नेते प्रकाश महाजन यांनी खासदार निशिकांत दुबे यांना खुलं आव्हान दिलं आहे.

हेही वाचा –  अभिषेक इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘ग्रीन डे’ साजरा

“राज ठाकरेंना तुम्ही काय हिंदी शिकवता? राज ठाकरेंच्या वडिलांनी मोहम्मद रफी यांच्याकडून मराठीत गाणे म्हणून घेतलेत. त्यामळे तुम्ही आम्हाला भाषा शिकवू नका. निशिकांत दुबेंपेक्षा राज ठाकरे यांची हिंदी कधीही चांगली आहे. आमचा भाषेला कधीही विरोध नाही आणि आम्ही कधीही भाषेला विरोध आहे असं म्हणत नाहीत, असं प्रकाश महाजन यांनी म्हटलं. तसेच इशारा देताना प्रकाश महाजन म्हणाले की, “निशिकांत दुबे यांना मी सांगतो की दिवस तुझा, मैदान तुझं, वेळही तुझी, कुठे येऊ हे फक्त सांग. मग कोण कोणाला पटक पटक मारतं ते दुनिया पाहील”, असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *