पंकजा मुंडे ठाकरे गाटात प्रवेश करणार? सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट
![Sushma Andhare said that Pankaja Munde Thackeray will enter the Ghat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/pankaja-munde-and-sushma-andhare-780x470.jpg)
पंकजा मुंडे ठाकरे गटाकडून मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार?
मुंबई : भाजपा नेत्या पंकजा मुंडे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्षात नाराज असल्याचा चर्चा सुरू आहेत. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंकजा मुंडे या ठाकरे गटात येऊ शकतात असा मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्या हॅलो महाराष्ट्रसोबत बोलत होत्या.
शिवसेनेची महिला मुख्यमंत्री कोण अशा सवाल त्यांना केला असता त्या म्हणाल्या की, आमच्या पक्षात अनेक नेत्यांची नाव आहेत. या व्यतिरिक्त सध्या आमच्याकडे जे इनकमिंग सुरू आहे त्यामधून भविष्यात अनेक नेतृत्व येऊ शकतात. कदाचित पंकजा मुंडे या सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात, असा दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
आमच्याकडे आत्ता सत्ता नाही, आमच्याकडे ५० खोके नाहीत, आम्ही कोणाला मंत्रीमंडळाचे अमिष देखवू शकत नाही, विधानपरिषद जागेबाबत कोणाला काही देऊ शकत नाही. आम्ही फक्त विश्वास देऊ शकतो तरी सुद्धा मराठवाड्यातील अनेक महिला नेत्या माझ्या संपर्कात आहेत. यामधील अनेक नेत्यांनी केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार म्हणून काम केलय आणि त्या आमच्या पक्षात येण्यास उत्सुक आहेत. त्यामुळे अशा अनेक महिला नेत्या आमच्या पक्षात येतील. त्यानंतर मग सर्वसमावेशक भूमिका ठरेल, परंतु आत्ता जे सध्या आमच्याकडे आहेत त्यापैकी कोणाला संधी मिळावी असं विचारल्यास किशोरी पेडणेकर यांना ती संधी मिळावी, अशी इच्छा यावेळी सुषमा अंधारेंनी व्यक्त केली.