‘अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन’; सुप्रिया सुळेंची स्तुतीसुमनं
पुणे : अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये यावं असं शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दीपक केसरकरांच्या या वक्तव्यावरून आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अभनेता अमिताभ बच्चन सगळ्या चित्रपटाच चालतो. मग अजितदादा महाराष्ट्राच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, अमिताभ बच्चन आपल्या देशातील सगळ्याच चित्रपट दिग्दर्शकांना आपल्या चित्रपटात असावा असं वाटतं. कारण त्यांचा आवाज चालतो, चेहरा चालतो, अभिनय चालतो इतकेच काय त्यांची स्वाक्षरीही चालती. तसंच राज्याच्या राजकारणात अजित पवार यांनाही घ्यावसं वाटतं. अजित पवार राज्याच्या राजकारणातील अमिताभ बच्चन आहेत. यात वाईट काय अशी मिश्किल टिप्पणी सुप्रिया सुळे यांनी केली.
हेही वाचा – Pune : आकाशवाणी पुणे केंद्रावरुनच बातमीपत्रे प्रसारित होणार
दरम्यान, मुंबई लोकलमध्ये झालेल्या महिला अत्याचारावरून देखील सुप्रिया सुळेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या की, सरकार महिलांबाबत असंवेदनशील आहे. मुंबईत महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. महिला सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी गृहखात्याची आहे. मात्र, ते सपशेल अपयशी ठरले आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.