breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

बारामतीत सुप्रिया सुळे यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची गळाभेट, चर्चांना उधाण

पुणे | बारामतीमधून सुप्रिया सुळेंसमोर अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात पवार विरूद्ध पवार असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी बारामतीमध्ये घडलेला एका घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शुक्रवारी संध्याकाळी सुप्रिया सुळे बारामतीच्य जळोचा काळेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्या ठिकाणी सुनेत्रा पवारही दर्शनासाठी उपस्थित होत्या. त्यामुळे गाभाऱ्याजवळ या दोघींचा आमना-सामना झाला. आता पुढे काय होणार याची उत्सुकता तिथे उपस्थित सगळ्यांच्याच चेहऱ्यावर दिसत होती. गाभाऱ्याजवळ उभ्या असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे स्मितहास्य करत सुप्रिया सुळेंनी त्यांची गळाभेट घेतली. दोघींनी एकमेकींची आपुलकीनं विचारपूस केल्याचं या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर सुप्रिया सुळेंनी गाभाऱ्यात दर्शनही घेतलं.

हेही वाचा    –    रात्री १ वाजेपर्यंत चालली शाहांबरोबरची बैठक; असा फॉर्म्युला ठरला

दरम्यान, बारामतीमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या एका सभेमध्ये सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला होता. आपल्या सुखदुखात कोण असेल अशाच लोकांना मतदान करा. मी जी मतं मागतेय ती मेरिटवर मागतेय. आणि मी मते मागतेय, सदानंद सुळेंना मत मागायला फिरवत नाहीय. गाव-वाडी-वस्तीवर मी फिरतेय. आणि असंच असलं पाहिजे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button