breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

शरद पवरांच्या आरोपांनंतर सुनील शेळकेंचा खुलासा; म्हणाले..

पुणे | मावळमध्ये झालेल्या जाहीर कार्यक्रमात बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना थेट दम भरला. जर इथल्या कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी केली, तर मला शरद पवार म्हणतात, असा इशारा शरद पवारांनी दिला. शरद पवारांच्या भाषणानंतर काही वेळातच आमदार सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिलं.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, मेळाव्याचं आयोजन करणाऱ्यांनी शरद पवारांना काही माहिती दिली. ‘मावळमधले शेकडो कार्यकर्ते अजित पवारांना सोडून शरद पवारांबरोबर यायला तयार आहे, तुम्ही त्यासाठी मावळमध्ये या’ अशी खोटी माहिती देऊन शरद पवारांना निमंत्रित केलं. सुनील शेळकेनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमाला न जाण्याबाबत दमदाटी केल्याचं शरद पवारांना या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. शरद पवारांनी त्यावर लगेच प्रतिक्रिया दिली. ते आमच्यासाठी आजही श्रद्धेय आहेत. पण त्यांनी या बाबतीत वक्तव्य करताना शहानिशा करणं अपेक्षित होतं.

हेही वाचा     –      शरद पवार यांचा भाषणातून आमदार सुनील शेळकेंना थेट इशारा; म्हणाले.. 

मी या बाबतीत शरद पवारांना भेटून विचारणार आहे. माझी काय चूक झाली आहे, हे त्यांनी सांगावं. कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेली माहिती खरी की खोटी हे त्यांनी तपासून पाहायला हवं होतं. पुढच्या ८ दिवसांत मी ज्याला फोन केला किंवा दमदाटी केली अशी एक तरी व्यक्ती उभी करावी, नाहीतर मी संपूर्ण महाराष्ट्रात सांगणार की शरद पवारांनी मावळमध्ये येऊन माझ्यावर खोटे आरोप केले. मी शरद पवारांना आव्हान देतो. त्यांना ज्यांनी माहिती दिली, त्यांनी एकतर पुरावे द्यावेत नाहीतर शरद पवारांनी माझ्या बाबतीत केलेलं वक्तव्य खोटं होते हे सांगावं. शरद पवारांनी माझ्या बाबतीत अशी टीका करणं मला अपेक्षित नव्हतं. त्यांनी माझ्यावर केलेल्या टीकेमध्ये काय तथ्य होतं, हे शरद पवारांनी मला सांगितलं पाहिजे, असंही सुनील शेळके म्हणाले.

शरद पवार नेमकं काय म्हणाले?

इथल्या दमदाटी करणाऱ्या आमदारांना मला सांगायचंय, बाबा रे, तू कुणामुळे आमदार झालास आठवतंय का? तुझ्या प्रचारसभेला कोण आलं होतं आठवतंय का? पक्षाचा फॉर्म आणि चिन्ह कुणी दिलं? माझ्या सहीनं तू तुझा अर्ज भरला होता आणि आज त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? पुन्हा दमदाटी केली तर शरद पवार म्हणतात मला. मी कधी या रस्त्याने जात नाही, पण तशी स्थिती निर्माण झाली तर कुणाला सोडत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button