Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

‘भाजपाने आमच्यात लुडबुड करू नये’; आमदार सुनील शेळके यांचा इशारा

पुणे | भाजपमधील नेत्यांनी पक्ष एकसंघ कसा ठेवता येईल हे पहावं. आमच्यात येऊन लुडबुड करून भांडण लावायचे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी दिला आहे. तसेच, मावळ विधानसभफा मतदारसंघात शरद पवरांचा छुपा पाठिंबा घेऊन पुरस्कृत उमेदवार उभा करण्याच्या हालचाली सुरू असल्याचे देखील सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.

सुनील शेळके म्हणाले, भाजप मधील पदाधिकारी कार्यकर्त्यांची दिशाभूल करत आहेत. जाणीवपूर्वक महायुतीत तेढ निर्माण करण्याची रणनीती आखत आहेत. भाजपमधील नेत्यांनी त्यांचा पक्ष एक संघ कसा ठेवता येईल हे पाहावं. आमच्याकडे येऊन लुडबुड करायची आणि भांडण लावायचे हे उपद्व्याप करू नयेत, असा इशारा शेळके यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, यांना राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटून वेगळं समीकरण जुळवायचं आहे. शरद पवार यांचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीचा पुरस्कृत उमेदवार उभा करायचा आहे. हे सर्व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे. तालुका आणि प्रदेश कार्यकारणी यांच्यात समन्वय होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका.

हेही वाचा    –      समीर भुजबळ मविआच्या वाटेवर? छगन भुजबळ म्हणाले.. 

मावळमध्ये महाविकास आघाडीमधील कुठलाच उमेदवार लढायला तयार नाही. यामुळे राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा घेऊन महाविकास आघाडीतील नेते किंवा घटक पक्ष एकत्र उमेदवार देत आहेत. वेगळी रणनीती आखत आहेत. यामागे काही भाजपचे नेते आहेत. तरीही महायुतीच्या उमेदवाराचा विजय होईल, असंही सुनील शेळके म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button