समीर भुजबळ मविआच्या वाटेवर? छगन भुजबळ म्हणाले..

Chhagan Bhujbal | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा माजी खासदार समीर भुजबळ महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चालू आहे. समीर भुजबळ शिवसेना ठाकरे गट किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. यावकून समीर भुजबळ यांचे काका मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले, की तुम्ही प्रसारमाध्यमं अशा बातम्या देत आहात, कदाचित तुम्हालाच जास्त माहिती असेल. समीर भुजबळ हे माझ्याबरोबर आहेत, अजित पवारांबरोबरच आहेत. आता येवला मतदारसंघात काम करणार आहेत. तुम्ही (माध्यमं) सल्ला देणाऱ्या बातम्या देत आहात का? तुम्हा प्रसारमाध्यमांच्या मनात तसं काही आहे का? समीर भुजबळ यांनी मविआकडे जावं असं तुम्हाला वाटतं का? कारण मला या बातम्या समजल्या नाहीत. त्या कशासाठी पसरवल्या जात आहेत ते देखील समजलं नाही. त्याहून महत्त्वाचं म्हणजे या बातम्यांचा मूळ आधार काय आहे, ते देखील मी समजू शकलो नाही.
हेही वाचा – मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला स्थगिती, नेमकं कारण काय?
मनोज जरांगे पाटीलांचे कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. याबाबत विचारलं असता, छगन भुजबळ म्हणाले, आपल्या देशात लोकशाही आहे. ते (मनोज जरांगे) जी भूमिका घेतील ते घेतील. मला तर असं वाटतं की त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजेत. लोकशाहीमध्ये सर्वांनाच अधिकार आहेत. राज्यात असे कितीतरी पक्ष निर्माण झाले आहेत. मनोज जरांगेंनी सुद्धा नशीब आजमावलं तर हरकत नाही, असंही ते म्हणाले.





