breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रराजकारण

सुप्रिया सुळेंवर सुनेत्रा पवारांचे ५५ लाखांचे कर्ज; एकूण संपत्ती किती?

पुणे | बारामती लोकसभा मतदारसंघात नणंद-भावजयी अशी लढत बघायला मिळत आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमदेवारी अर्ज दाखल करताना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं. त्यावेळी दोन्ही उमेदवारांच्या संपत्तीची माहिती समोर आलीये. यामध्ये सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडून ५५ लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे.

विद्यामान खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे कुटुंबीय अब्जाधीश असून, सुळे कुटुंबाची एकूण संपत्ती सुमारे १६६ कोटी ५१ लाख ८६ हजार ३४८ रुपयांच्या घरात पोहोचली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या उत्पन्नात एक कोटी आठ लाख ९७ हजार ३४८ रुपयांनी भर पडली आहे. सुळे कुटुंबीयांचे वार्षिक उत्पन्न सरासरी ५.६८ कोटी रुपये असून, सुळे यांनी सुनेत्रा पवार आणि त्यांचा मुलगा पार्थ पवार यांच्याकडून सन २०१९ मध्ये उसने घेतलेले ५५ लाख रुपये पाच वर्षांनंतरही फेडलेले नाहीत. पार्थ यांच्याकडून २० लाख रुपये, तर सुनेत्रा पवार यांच्याकडून ३५ लाख रुपये घेण्यात आले आहेत. त्यांच्यावर अन्य कोणत्याही संस्थेचे कर्ज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा    –      रामाच्या मंदिरात सीतेची मूर्ती का नाही? शरद पवारांचं विधान

सुप्रिया सुळे यांनी सुमारे तीन कोटी ५८ लाख ७७ हजार २३० रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत. सुळे यांचे पती सदानंद सुळे यांनी सुमारे सहा कोटी ५५ लाख १६ हजार ६७३ रुपये विदेशी बँकांमध्ये गुंतविले आहेत. सुळे यांच्याकडे दोन कोटी ६१ लाखांच्या सोने-चांदी आणि मौल्यवान वस्तू आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांना ८२ लाख ८१ हजार ८७८ रुपये, अजित पवार यांना ६३ लाख २० हजार ३०३ रुपये, शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना ५० लाख रुपये, तर सुप्रिया सुळे यांना ३५ लाख रुपयांचे कर्ज दिल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button