शरद पवारांच्या चुका काढण्याइतके अजितदादा मोठे झालेत का? श्रीनिवास पवार

पुणे | अजित पवार यांनी काल बारामती विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मतदारसंघात मोठं शक्तिप्रदर्शन केलं. तसेच कन्हेरी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी, अजित पवार म्हणाले, मी सुनेत्रा पवारांना लोकसभा निवडणुकीत बारामतीतून उभं करून चूक केली. तीच चूक आता वरिष्ठ (शरद पवार) करत आहेत. त्यावर अजित पवारांचे थोरले भाऊ श्रीनिवास पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
श्रीनिवास पवार म्हणाले, की चूक व्हायच्या आधी आम्ही त्यांना सांगत होतो. त्यांनी तेव्हाच ते थांबवायला पाहिजे होते. आता झालं गेलं ते त्यांनी सोडून द्यायला हवं. शरद पवार यांच्या चुका काढण्याइतके दादा (अजित पवार) मोठे झाले आहेत का? ते इतके मोठे कधी झाले हे
हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांनी काढला हुकमी एक्का.. : पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्षपदी शत्रुघ्न काटे
मलाच माहिती नाही आणि मुळात सुरुवात कोणी केली? एखादा घाव बसल्यानंतर तो घाव बरा होतो, मात्र, त्याचे व्रण तसेच राहतात.
तात्याराव पवारांचं (अजित पवार व श्रीनिवास पवार यांचे वडील) घर फोडलं, असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. यावरून श्रीनिवास पवार म्हणाले, मी तसं काही मानत नाही. अजित पवार यांच्या डोक्यात असले विचार येत असतील तर त्यावर मी काही बोलणार नाही. मी सर्वांना एकच समजतो. राजकारणी लोकांचं राजकारण चालू राहतं. परंतु, कोणीही घरातील गोष्टी बाहेर मांडू नयेत आणि कुणी त्यावर बोलत असेल तर मला त्याची कल्पना नाही.





