breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

महिलांना सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांची प्रमुख भुमिका : सचिन साठे

  • असंघटीत कामगार कॉंग्रेसने केला महिलांचा सत्कार

पिंपरी | प्रतिनिधी 

अन्न सुरक्षा कायदा, शिक्षण हक्क कायदा आणि माहितीचा अधिकार कायदा हे यूपीए सरकारच्या काळात झाले. लोकशाही देशात सर्व सामान्य नागरिकांना अधिक सक्षम करण्यासाठी अखिल भारतीय कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी हे कायदे केले. अन्न सुरक्षा कायद्यामुळे गोरगरिब जनतेला दोन वेळचे जेवण मिळण्याची हमी मिळाली. शिक्षण हक्क कायद्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मोफत मिळत आहे. माहितीचा अधिकार कायद्यामुळे सर्व सामान्य नागरिक देखिल प्रशासनाच्या कारभाराची माहिती मिळवू शकत आहे. लोकशाही राज्यात महिलांना देखिल सन्मान देण्यासाठी सोनिया गांधी यांनी प्रमुख भुमिका बजावली. त्यांच्यामुळेच प्रतिभाताई पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि मीरा कुमार या लोकसभेच्या पहिल्या सभापती होऊ शकल्या असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सचिव सचिन साठे यांनी केले.

गुरुवारी (दि. 9 डिसेंबर) सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड असंघटीत कामगार व कर्मचारी कॉंग्रेस संलग्न घरेलू महिला कॉंग्रेसच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात साठे यांच्या हस्ते आरोग्य व वैद्यकीय विभागातील महिला, घरेलू कामगार महिला आणि घंटागाडी महिला कामगार यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश समन्वयक शीतल कोतवाल यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रथम बुधवारी हेलिकॉप्टर दुर्घटनेत ठार झालेले भारताचे पहिले सीडीएस बीपीन रावत आणि इतर तेरा जणांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. यानंतर काशीबाई तोरड, भारती क्षीरसागर, भामाबाई दणके, असरीफुल शेख, कल्पना माने, नंदा कुंजीर, छाया प्रधान, काजल गायकवाड, गंगा लाड, रंजना शिंदे आदींचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पिंपरी चिंचवड असंघटीत कामगार व कर्मचारी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सुंदर कांबळे, ज्येष्ठ नेते किशोर कळसकर, संदेश नवले, अशोक काळभोर, दिलीप साळवी, मालन गायकवाड, वृषाली कदम, प्रज्ञा कांबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक शीतल कोतवाल, सुत्रसंचालन आझरभाई पुणेकर आणि आभार वंदना आराख यांनी मानले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button