breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

मिशन विधानसभा निवडणूक: समस्यांनी घेरलयं, आता आम्हाला बदल हवाय!

देहू आळंदी रस्त्यावरील सोसायटी धारकांनी अजित गव्हाणे यांच्याकडे व्यक्त केल्या भावना

पिंपरी | वाहतूक कोंडी आणि वाढते प्रदूषण या समस्या आम्हाला भेडसावत आहे. पाणीटंचाई पाहता आम्ही नक्की महापालिका क्षेत्रात राहतो का असा प्रश्न पडतो. भोसरी ते मोशी, देहू – आळंदी अशी आमच्या दोन्ही बाजूने रस्त्यावरील वाहतूक कोंडी फुटण्याचे नाव घेत नाही. प्रदूषणही वाढत आहे. गेल्या दहा वर्षापासून आम्ही याच समस्यांनी हैराण असल्याचे देहू आळंदी रस्त्यावरील सोसायटी धारकांनी सांगितले. गेल्या दहा वर्षापासून आम्हाला याच समस्यांनी घेरले आहे. आता यातून आम्हाला बाहेर पडायचे आहे असे म्हणत “आम्हाला आता बदल हवाय” अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.
स्था

यी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी नुकताच देहू आळंदी रस्ता, जाधववाडी, छत्रपती संभाजी महाराज मार्गावरील सोसायट्यांमध्ये गाठीभेटी घेतल्या. या भागाचा दौरा करताना नागरिकांशी संवाद देखील साधला. राधाकृष्ण, विष्णू विहार, विष्णू ग्रीन, एव्हरेस्ट प्लाझा, इमॅजिका, लेवोनिस्ट येथील सोसायटी धारकांनी यावेळी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. रोजच्या त्याच त्या समस्यांनी या भागाला अक्षरशः वेढले आहे असे नागरिकांनी सांगितले. यावेळी माजी नगरसेवक वसंत बोराटे, युवा नेते विशाल आहेर, राहुल बनकर, प्रदीप आहेर, सुभाष धायरकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा     –      ‘महाराष्ट्रात जे काही घडले, ते राज्याच्या हिताचे नाही’; राज्यातील तणावपूर्ण स्थितीवर शरद पवारांचं भाष्य

नागरिकांनी अजित गव्हाणे यांना सांगितले, देहू आळंदी जाधववाडी, छत्रपती संभाजी महाराज मार्गालगत असणाऱ्या अनेक सोसायट्यांना आजही पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. पिंपरी महापालिकेचे पाणी दिवसाआड येते. येथे पाण्याचे कोणतेही नियोजन नाही. काही वेळा दूषित पाणीपुरवठा देखील होत असतो. यामुळे वृद्ध, गरोदर स्त्रिया, लहान मुले यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो . पाणी फिल्टर करूनच प्यावे लागते. याचा अतिरिक्त खर्च आहेच. शिवाय यासाठी लागणारी वीज देखील व्यवस्थित उपलब्ध होत नाही.विजेचा कायम लपंडाव असतो. या भागाच्या दुतर्फा असणाऱ्या रस्त्यांची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे. ये जा करणारे रस्ते खड्डेमय आहेत. भोसरी ते मोशी, मोशी ते देहू रस्ता या रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’ आहे.

या भागात अनेक भंगार व्यवसायिकांची दुकाने, गोदामे आहेत. या दुकानांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नाही. वारंवार येथे अनेक अपघातांच्या घटना घडत असतात. आगीच्या घटनांनी या भागातील प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत आहे असे देखील येथील नागरिकांनी सांगितले.

गेले दहा वर्षापासून येथील नागरिक पाणी, वीज आणि शांततापूर्ण वातावरणाची मागणी करत आहेत. मात्र एकहाती सत्ता असणाऱ्या स्थानिक आमदारांनी गेल्या दहा वर्षात यातील एकही मागणी पूर्ण केलेली नाही. ”व्हिजन”च्या कागदोपत्री गप्पा आणि भ्रष्टाचार यामध्ये या भागाची अक्षरशः वाताहत झाली आहे. त्यामुळे नागरिक आता सत्ता परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत आहेत.

– किरण आहेर, युवा नेते, जाधववाडी.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button