breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

धक्कादायक! निवडणुकीत पराभवामुळे चिडलेल्या उमेदवाराचं तालिबानी कृत्य; दलित मतदारांना शिवीगाळ करत मारहाण

नवी दिल्ली |

बिहारच्या औरंगाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. निवडणुकीतील पराभवामुळे चिडलेल्या सरपंच पदाच्या उमेदवाराने मतदारांसोबत गैरवर्तणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या उमेदवाराने दलित मतदारांना जबरदस्तीने थुंकी चाटायला लावल्याची लाजीरवाणी बाब समोर आली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील पंचायत निवडणुकीच्या दहाव्या टप्प्यांतर्गत कुटुंबा गटात झालेल्या पंचायत निवडणुकीत पराभव झाल्यामुळे एका उमेदवाराने आपल्या भागातील दलित मतदारांना मारहाण केली.

औरंगाबादच्या कुटुंबा ब्लॉकच्या सिंघना पंचायतीच्या खरांटी टोले भुइया येथील उमेदवार बलवंत सिंग यांनी निवडणूक हरल्यानंतर दलित मतदारांना मारहाण केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या मतदारांना थुंकी चाटायला लावली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओची त्वरित दखल घेत औरंगाबाद जिल्ह्याचे डीएम सौरभ जोरवाल आणि एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी अंबा पोलीस स्टेशनला एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक बलवंत सिंगच्या या तालिबानी कृत्याने हैराण झाले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपी बलवंत सिंह म्हणत आहे की, त्याने निवडणुकीदरम्यान दोन मतदारांना पैसे दिले होते. मात्र पैसे देऊनगी मतदान केले नाही. यात सिंग मतदारांना शिवीगाळ करताना, कान पकडून त्यांना शिक्षा करताना दिसून येत आहे. दुसरीकडे, बलवंत सिंग म्हणाले की, दोन्ही तरुण दारूच्या नशेत दंगा करत होते. त्यांना शांत करण्यासाठी आपण त्यांना शिक्षा केली. मात्र आरोपी पैसे देण्याबाबत बोलत असल्याचे व्हायरल व्हिडिओवरून स्पष्ट होत आहे. व्हिडिओच्या आधारे आरोपी सिंगला अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button