breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीचा धक्कादायक ओपिनियन पोल समोर; पाहा कोणाला किती जागा?

मुंबई : लोकसभा निवडणुकीला एका वर्षापेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. यासाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. भाजपाला केंद्रातील सत्तेतून पायउतार करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात कोणाला किती जागा मिळणार? याचा एक धक्कादायक ओपिनियन पोल समोर आला आहे. सीएनएक्सने हा पोल केला आहे.

सीएनएक्सच्या पोलनुसार महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा आहेत. यापैकी २० भाजपाला मिळण्याची शक्यता आहे, तर शिवसेना ठाकरे गटाला ११ जागा मिळतील. काँग्रेसला ९ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४ जागा मिळतील. यासोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला २ आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला २ जागा मिळतील अशी शक्यता या सर्वेत वर्तवली आहे.

हेही वाचा – ..तर हा देश नालायक आणि हुकूमशहांच्या हातात जाईल, उद्धव ठाकरेंचा भाजप व नरेंद्र मोदींवर हल्लाबोल

मतांच्या टक्केवारीचा विचार केला असता सर्वाधिक भाजपाला ३२ टक्के, शिवसेना ठाकरे गटाला १६ टक्के, काँग्रेसला १६ टक्के, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला १६ टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ७ टक्के, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला ५ टक्के तर इतर पक्षांना ११ टक्के मते मिळतील, असंही या सर्वेत म्हटलं आहे.

विभागनिहाय कोणाला किती जागा :

उत्तर महाराष्ट्र ( ६ जागा)

NDA – ३
INDIA – ३

विदर्भ ( १० जागा)

NDA – ५
INDIA – ५

मराठवाडा ( ८ जागा)

NDA – २
INDIA – ६

मुंबई ( ६ जागा)

NDA – ४
INDIA – २

कोकण आणि ठाणे ( ७ जागा)

NDA – ५
INDIA – २

पश्चिम महाराष्ट्र ( ११ जागा)

NDA – ५
INDIA – ६

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button