breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

हडपसरमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचाराचा झंझावात

शिरुर लोकसभा रणसंग्राम : सर्वसामान्य नागरिकांचा प्रचार दौऱ्याला प्रतिसाद

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता राज्यात चांगलाच जोर धरला आहे. यातच शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटलांनी प्रचार दणक्यात सुरू केला आहे. यातच शिवाजीराव आढळरावांनी हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांच्या भेटी गाठी घेत आपला प्रचार केला. यावेळी त्यांच्या प्रचाराला नागरिकांनी देखील मोठी प्रतिसाद दिला.

यावेळी हडपसर विधानसभेचे आमदार चेतन तुपे,  आमदार योगेश टिळेकर, पुणे शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, राष्ट्रवादी हडपसर विधानसभा अध्यक्ष शंतनू जगदाळे, मनसे नेते बाबू वागस्कर, नगरसेविका नंदा लोणकर, कार्याध्यक्ष संदीप बधे, विभाग प्रमुख अभिमन्यू भानगिरे, भाजप सरचिटणीस गणेश घुले, मतदारसंघ अध्यक्ष संदीप दळवी, हडपसर कार्याध्यक्षा स्मिता दातीर बडदे, ओबीसी सेल हडपसर अध्यक्षा मोनिकाताई काळे, अन्न धान्य दक्षता समिती सदस्य महाराष्ट्र शासन राजू अडागळे, भाजप नेते प्रवीण जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अध्यक्ष संजय लोणकर, मयुवक अध्यक्ष राकेश कामठे, वार्ड अध्यक्ष सोमनाथ गालभिडे, उपाध्यक्ष दिवाकर भाटरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानसभा अध्यक्ष मोहन क्षिरसागर, हडपसर विधानसभा सरचिटणीस वैभव लोखंडे व राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपा व महायुतीचे घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यातच हडपसर दौऱ्यावर असता आढळरावांनी पिंगळे वस्ती मुंढवा येथील अखिल गणेश बाग मि६ मंडळाला भेट दिली. यावेळी पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाळासाहेब कोदरे उर्फ सदानंद कोदरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. त्याचबरोबर जनसेवा बॅंकेचे संचालक विनायक गायकवाड यांनी मुंढवाचा कायम आपल्या उमेदवाराला असलेल्या पाठिंब्याची पुनरावृत्ती करत घड्याळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून देण्याचे त्यांनी आव्हान केले.

दरम्यान, यावेळी आढळरावांनी कौसरबाग कोंढवा, अरेबियन बाईट्स येथील अल्पसंख्यांक पुणे शहराचे अध्यक्ष समीर शेख यांच्या जनसंपर्क कार्यालयालाही भेट दिली. त्याचबरोबर बीटी कवडे रोड, प्रभाग क्रमांक २१ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष साधना बँक चेअरमन चंद्रकांत नारायण कवडे व नगरसेविका सुरेखाताई कवडे यांच्या निवासस्थानी देखील आढळरावांनी सदिच्छा भेट दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button