breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

प्रतीक्षा संपली! शिवरायांची वाघनखं उद्या महाराष्ट्रात येणार

मुंबई | छत्रपती शिवरायांची बहुप्रतिक्षित वाघनखं अखेर विशेष विमानाने उद्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यानंतर ती साताऱ्यात आणण्यात येणार असून १९ जुलैला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळा होणार आहे. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज प्राचीन वस्तू संग्रहालयामध्ये ही वाघनखं लोकांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. यासाठी विशेष दालनही उभारण्यात आलं आहे.

पुरातत्त्व विभागाच्या साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात ही वाघनखे ठेवण्यात येणार असून शुक्रवारी १९ जुलै रोजी भव्य दिव्य सोहळा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह राज्यातील इतर लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

हेही वाचा    –      पूजा खेडकर प्रकरण म्हणजे राजकीय कारस्थान? IAS पूजा खेडकर यांच्या वडिलांचा मोठा दावा!

दरम्यान, वाघ नख भारतात आणण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर आपल्या अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च जेवढा आहे त्याच्या कितीतरी पट कमी खर्च झाला असल्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले. वाघनखं आणण्यासाठी जाण्याचा आणि येण्याचा १४ लाख ८ हजार रुपये खर्च झाला असल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button