Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारण

पिंपरी-चिंचवडमधील शिवसेनेच्या रणरागिनीचा उबाठा गटाला ‘जय महाराष्ट्र’

सुलभा उबाळे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश : शहरातील महाविकास आघाडीला आणखी एक धक्का

पिंपरी-चिंचवड : विशेष प्रतिनिधी । पिंपरी-चिंचवड शहरातील अत्यंत आक्रमक आणि धडाडीच्या शिवसेना नेत्या आणि माजी गटनेत्या सुलभा उबाळे यांनी अखेर ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उबाळे यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यामुळे शहरात ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये सुलभा उबाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. उबाळे गेल्या 36 वर्षांपासून सक्रीय राजकारणात आहेत. महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या, गटनेत्या म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली आहे. तसेच, शिरुर लोकसभा प्रमुख आणि पुणे जिल्हा संघटिका म्हणून त्या ठाकरे गटात कार्यरत होत्या.

शिवसेनेत उभी फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षावर दावा केला. त्यावेळी उबाळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. विधानसभा निवडणूक 2024 मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भोसरी विधानसभा मतदार संघ शिवसेनेला सोडला जाईल आणि मशाल चिन्हावर निवडणूक लढवता येईल, अशी तयारी त्यांनी केली होती. मात्र, सदर मतदार संघ राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यात आला.

तसेच, पिंपरी-चिंचवडमधील एकही मतदार संघ ‘‘मशाल’’ चिन्हासाठी मिळाला नाही. त्यामुळे सुलभा उबाळे यांच्यासह अनेक निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. विधानसभा निवडणुकीनंतर उबाळे यांनी पक्षकार्यातून अलिप्त राहिल्याचे चित्र होते. अखेर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. परिणामी, महाविकास आघाडीला शहरात आणखी एक धक्का मानला जात आहे.

जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची साथ…

प्रवेशासाठी युवा सेना शहर प्रमुख भोसरी विधानसभा अजिंक्य उबाळे, युवा सेना प्रमुख विशाल उबाळे, उप जिल्हा प्रमुख पुणे अमित शिंदे, प्रसिद्धीप्रमुख भोसरी विधानसभा सार्थक दोषी, विभागप्रमुख अनिकेत येरुणकर, उपशहर अधिकारी पिंपरी चिंचवड युवा सेना सागर शिंदे, विभागप्रमुख किरण वाडकर, शाखा प्रमुख संकेत मारवलकर, विभागप्रमुख रुपीनगर अभिषेक सुरवसे, शाखा प्रमुख सागर मुणगेकर, सुरज कदम, तेजस पवार, उपशाखाप्रमुख गणेश शिंदे, सिद्धांत दोषी, अविनाश खडके, प्रभागप्रमुख कुणाल डमरे, शाखाप्रमुख सुहास तळेकर, शुभम महाडिक, संतोष भोसले, वैभव सस्ते, गटप्रमुख लोकेश मुचूनडिकर, शाखाप्रमुख निखील पिसे, हेमंत पळसकर, अमोल मोरे, प्रभागप्रमुख सोमनाथ थरकुडे, शुद्धोधन भालेराव, शाखाप्रमुख अजय मिसाळ, बंटी काकडे, नरेंद्र पाटील, प्रवीण येवले, शुभम नेमाने यांनी प्रवेश केला.

शहर शिवसेना ठाकरे गटाला खिंडार…

तसेच, संतोष सौंदणकर, शिवसेना शहर संघटक, पिं चिं शहर, सुधाकर नलावडे, उप शहर प्रमुख पिं चिं शहर, गणेश झिळे, उप विभाग प्रमुख, राजेंद्र पालांडे, विभाग संघटक काळेवाडी, कौस्तुभ गोळे, उप विभाग प्रमुख महेश डोके, शाखाप्रमुख विजय घुले, सुहास फडकले, विभाग संघटक ॲड योगेश शिंदे, प्रभाकर पवार, गटप्रमुख सुभाष पवार, गोपाळ अप्पा काळभोर, किरण शेलार, विजय मोगरे, गजानन ढमाले, प्रकाश वाडकर, गणेश बोडरे, संदीप कोठावदे, मनोज कांबळे, मिलिंद कोंढाळकर, राजकुमार डमरे, सुजित माने, अमर पवार, गणेश शेवाळे, नरेश उंद्रे, गणेश शिंदे, सचिन मसने, प्रणव नागर, बाजीराव पळसकर, लक्ष्मण राउत, हनुमंत पळसकर यांनीही शिवसेना शिंदे गटाचा झेंडा खांद्यावर घेतला आहे.

महिला शक्तीची साथ…

सुजाता काटे, भोसरी विधानसभा समन्व्यक महिला आघाडी, शशिकला उभे, उपशहर संघटिका, भारती चकवे, विभाग संघटिका, निर्मला पाटील, उप शहर प्रमुख, लिलावती देवकाते, उप शहर प्रमुख, सांगिता टुपके, विभाग संघटिका, नजमा शेख, विभाग संघटिका दमयंती गायकवाड, उप विभाग संघटिका, तहेरा शेख, उप विभाग संघटिका, ममता कदम, विभाग संघटिका, कावेरी परदेशी, शाखाप्रमुख प्रिया जपे, उप शाखाप्रमुख, नयना पारखे, उप शाखाप्रमुख, स्मिता मोगरे, गटप्रमुख, लीना नेहते, गटप्रमुख मंदा पाटील, गटप्रमुख दीपा जागते
गटप्रमुख, वैशाली जिडेवार, गटप्रमुख, नम्रता जाधव, गटप्रमुख, अश्विनी डोके, गटप्रमुख, प्रज्ञा कोटावडे, गटप्रमुख, स्वाती चौधरी, गटप्रमुख, समीक्षा जागते, गटप्रमुख, मंगल पाटील, गटप्रमुख, शिल्पा साळवे, गटप्रमुख यांनीही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला.

हेही वाचा: अतिरिक्त जलस्त्रोत : कालवा समितीत डावलले; जलसंपदा मंत्र्यांनी सावरले!

सुलभा उबाळे यांचा राजकीय जीवनप्रवास… 

1992 : शिवसेना शाखा प्रमुख म्हणून कामाला सुरुवात..
1997 : नगरसेवक
1998:  विरोधी पक्षनेता
1999 : उप सभापती
2001 :  अ प्रभाग समिती
2007-12 : शिवसेना गटनेता, स्थायी समिती सदस्य.
2009 : भोसरी विधानसभा निवडणूक अवघ्या 1272 मतांनी पराभव.
2014-2017 : गटनेता
2014 : भोसरी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी 15 हजार 641 मतांनी पराभव.
संघटनात्मक पदे : 
उप जिल्हा संघटिका : शिवसेना महिला आघाडी
शिवसेना शहर संघटिका : पिंपरी चिंचवड म्हणून 5 वर्ष
जिल्हा संघटिका : 2017 ते आजतगायत
अध्यक्ष : पिंपरी-चिंचवड महिला बचत गट महासंघ.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button