breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना खासदाराचा काँग्रेसच्या नेत्याला वाकून नमस्कार, म्हणाले, ‘त्यांना जागा दाखवायचीये’

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीने पुन्हा एकदा शक्तीप्रदर्शन केलं आहे. राज्यसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया किचकट असल्याने आमदारांच्या समुपदेशनासाठी आणि आपल्या आमदारांची फाटाफूट होऊ नये, यासाठी शिवसेनेने आपले विधानससभा सदस्यांना मुंबईतील ट्रायडंट हॉटेल इथे मुक्कामी ठेवले आहेत. आज याच हॉटेलमध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आमदारांसहित महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीवेळी प्रमुख नेत्यांचं आगमन होताच मविआच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. तत्पूर्वी ज्येष्ठ नेते तथा काँग्रेसचे राज्यसभा निवडणूक निरीक्षक मल्लिकार्जून खरगे यांचं आगमन होताच सेना खासदार अरविंद सावंत यांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तसेच ‘त्यांना जागा दाखवायचीये’ म्हणत भाजपला इशारा दिला तर मविआला ऐक्याचं बळ दाखवायचंय असंही सूचित केलं.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने तिन्ही पक्षातील सर्व आमदारांची मुंबईतील ट्रायडंट हॉटेलमध्ये बैठक बोलावली होती. महाविकास आघाडीने २०१९ च्या विधानसभा सत्तानाट्यावेळी ज्याप्रमाणे शक्ती प्रदर्शन केलं तसंच शक्तीप्रदर्शन आजही तिन्ही पक्षांनी केले. महाविकास आघाडीचे सर्व आमदार आणि मंत्री देखील या बैठकीला उपस्थित आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे निरीक्षक मल्लिकार्जून खर्गे आणि प्रभारी एच.के.पाटील उपस्थित आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार, मल्लिकार्जून खरगे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मविआच्या आमदारांना मार्गदर्शन केलं. विशेष गोष्ट म्हणजे अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या १२ आमदारांनी या बैठकीला उपस्थिती लावली होती.

नेमकं काय घडलं?

अरविंद सावंत यांनी मल्लिकार्जुन खरगे यांचं स्वागत केलं. त्यांना वाकून नमस्कार केला. तसेच आपण यांना जागा दाखवायची म्हणत भाजपला इशारा दिला तर मविआला ऐक्याचं बळ दाखवायचंय असंही सूचित केलं. त्यावर ‘सगळं काही ठीक करायचं आहे’, असा मनसुबा खरगे यांनी बोलून दाखवला.

बंगालमध्ये दीदींना जसं भाजपला गाडलं, ती वेळ आता महाराष्ट्रात आलीय : उद्धव ठाकरे

“राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होते. तशी आपली परंपरा होती. पण भाजपमुळे राज्यात राज्यसभेची निवडणूक लागली आहे. कोणी कितीही प्रयत्न केले, तरी महाविकास आघाडी भक्कम आहे. त्यामुळे मविआचे चारही उमेदवार निवडून येतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला. बंगालमध्ये ममता दीदींनी भाजपला जसं गाडलं, आता तीच वेळ महाराष्ट्रात आलीय, असा मनसुबा मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत बोलून दाखवला.

बैठकीला कोण कोणते अपक्ष आमदार उपस्थित

महाविकास आघाडीला अपक्ष आमदारांचं मन वळवण्यात यश आल्याचं या निमित्तानं दिसून आलं. गीता जैन, मंजुळा गावीत, आशिष जैस्वाल, देवेंद्र भुयार (स्वाभिमानी पक्ष), किशोर जोरगेवार, संजय शिंदे, नरेंद्र बोंडेकर, शामसुंदर शिंगे (शेकाप), विनोद अग्रवाल, चंद्रकांत पाटील, राजकुमार पटेल (प्रहार जनशक्ती पक्ष),विनोद निकोले (माकप) उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button