breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शिवसेना नेते एकनाथ शिंदेंकडून ‘डॅमेज कण्ट्रोल’चा प्रयत्न? आसाममधील पूरग्रस्तांसाठी जाहीर केली मदत

मुंबई : राज्यात सध्या अभूतपूर्व राजकीय स्थिती निर्माण झाली आहे. ज्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवून जिंकली त्याच ठाकरे यांच्या मुख्यमंत्रिपदाला शिवसेनेच्याच जवळपास ४० आमदारांनी आव्हान दिलं आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बंडखोर आमदार गेल्या काही दिवसांपासून आसाममधील गुवाहाटी येथे वास्तव्यास आहेत. आसाममध्ये मोठा पूर आलेला असताना महाराष्ट्रातील नेते तिथे पंचतारांकित हॉटेलमध्ये मौजमजा करत आहेत, अशी टीका होत होती. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.

‘आसाममधील पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी शिवसेनेचे सर्व आमदार तसंच सहयोगी आमदारांच्या वतीने आसाम मुख्यमंत्री मदत निधीत ५१ लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून दिली आहे. दरम्यान, मुंबईतील कुर्ला परिसरात काल इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतरही तेथील आमदार आमदार आणि सध्या गुवाहाटीत मुक्कामाला असलेल्या मंगेश कुडाळकर यांनी जखमींना आणि मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना आर्थिक मदत देण्यात येणार असल्याचं जाहीर केलं होतं.

आसाममध्ये नेमकी काय आहे स्थिती?

आसाममध्ये पुरामुळे भीषण स्थिती निर्माण झाली आहे. पूर्वीकडील राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यावर्षी मे आणि जूनमध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त पडल्याचं एएसडीएमएनं म्हटलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आलेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी मेघालयात गेल्या एका आठवड्यात १७२ टक्के जास्त पाऊस झाला. आसाममध्ये १०० टक्के जास्त आणि अरुणाचल प्रदेशात सरासरीपेक्षा २८ टक्के जास्त पाऊस झाला आहे. आसाममधील ३६ पैकी ३२ जिल्ह्यांमध्ये ५० लाखांहून अधिक लोकांना पुराचा फटका बसला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button