शिराळा : तालुक्यातील बिळाशीत आम आदमी पार्टीची पहिली ‘स्वराज्य संवाद’ सभा
जिल्हा समन्वयक राम पाटील : क्रांतीकारकांच्या गावातून अभियानाची सुरवात ही अभिमानाची बाब!
![Shirala: The first 'Swarajya Samvad' meeting of Aam Aadmi Party in Bilashit of the taluk](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/06/Ram-Patil-Shirala-780x470.jpg)
शिराळा : बिळाशी या गावाला ऐतिहासिक वारसा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांविरोधात लढा पुकारुन या गावात क्रांतीची ज्योत पेटवण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना करुन ज्याप्रमाणे रयतेचे राज्य निर्माण व्हावे. याकरिता याच गावातून ‘इन्कलाब झिंदाबाद’ चा नारा दिला गेला. त्याप्रमाणे आपचे संस्थापक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरजीवाल यांच्या संकल्पनेतून सर्वसामान्य नागरिकांचे ‘स्वराज्य’ निर्मितीसाठी ‘स्वराज्य संवाद’ आयोजित केला आहे, असे मत आपचे सांगली जिल्हा समन्वयक राम पाटील यांनी व्यक्त केले.
आम आदमी पार्टीच्या माध्यमातून शिराळा तालुक्यातील पहिली ‘स्वराज्य संवाद’ सभा बिळाशीत झाली. यावेळी राम पाटील बोलत होते.
राम पाटील म्हणाले की, आम आदमी पार्टी तर्फे सांगली जिल्ह्यामध्ये सर्वत्र स्वराज्य संवाद सभा आयोजित करण्यात येत आहेत. शिराळा तालुक्यामध्ये ऐतिहासिक वारसा असलेले आणि क्रांतिकारकांचे गाव म्हणून ओळख असणारे बिळाशी या गावातून आम आदमी पार्टीच्या संवाद स्वराज्य संवाद सभेला सुरुवात झाली.
आम आदमी पार्टीतर्फे मागच्याच आठ-दहा दिवसांपूर्वी दिनांक 28 मे 2023 ते 6 जून 2023 या कालावधीमध्ये महाराष्ट्र मध्ये आम आदमी पार्टी तर्फे स्वराज्य यात्रा पंढरपूर ते रायगड काढण्यात आली यामध्ये लोकांचे प्रश्न जाणून घेतले आणि त्याच्यावरती वाचा फोडण्यासाठी आता दिनांक 12 जून 2023 ते 18 जून 2023 या दरम्यान मध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी आम आदमी पार्टीतर्फे स्वराज्य संवाद सभा आयोजित केले आहेत.
स्वच्छ कारभाराबाबत जनजागृती…
यामध्ये लोकांमध्ये जाऊन कोपरा सभा छोट्या छोट्या सभा आयोजित करून आम आदमी पक्षाची ध्येय धोरणे त्याचबरोबर लोकांबरोबर चर्चा करून स्थानिक प्रश्न समजावून घेणे आणि आम आदमी पार्टीची महाराष्ट्रातील पुढील दिशा काय असेल या संदर्भात लोकांना कल्पना देणे पक्ष प्रवेश करून घेणे नवीन सदयस जोडणे, तसेच, आम आदमी पार्टीने ज्याप्रमाणे पंजाब आणि दिल्लीमध्ये ज्या प्रकारची काम केलेले स्वच्छ कारभार जनसामान्यांना दिलेल्या सुविधा या महाराष्ट्रातील जनतेला या संवादाच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे.