शिंदे आता कुणाचा बळी द्यायला गुवाहाटीला जाताहेत – अजित पवार
![Shinde now goes to Guwahati to sacrifice someone - Ajit Pawar](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/11/Dada-Bhuse-700x470.jpg)
मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।
एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी ४० आमदारांसह शिवसेनेत बंड केलं. गुजरातनंतर एकनाथ शिंदे सर्व बंडखोर आमदारांसह गुवाहाटीला मुक्कामाला होते. येथे कामाख्या देवीच्या दर्शन घेऊन सर्व आमदारांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. त्यानंतर महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि सत्तांतर झालं.
आता पुन्हा एकनाथ शिंदे आपल्या ४० आमदारांसह उद्या (शनिवारी) गुवाहाटीला जाऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत.यावरुन राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदेंना टोमणा हाणला आहे. अजित पवार आज (शुक्रवारी) पुण्यात माध्यमांशी बोलत होते. पुण्यातील कालवा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दे कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत, त्यांना शुभेच्छा. कामाख्या देवीला रेड्याचा बळी दिला जातो, शिंदे गट आता कुणाचा बळी द्यायला गुवाहाटीला जात आहेत, हे माहित नाही,” अशा शब्दात अजितदादांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची खिल्ली उडवली आहे.
कर्नाटकच्या बसला काळे फासले ; ठाकरे गट आक्रमक
२० नोव्हेंबरला एकनाथ शिंदे सर्व आमदारांसह गुवाहाटीला जाणार होते, ती तारीख रद्द करण्यात आली होती, त्यानंतर शिंदे गट उद्या (शनिवारी) गुवाहाटीला जात आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे हे देवदर्शन करण्यात मग्न असल्याची टीका विरोधक करीत असताना पुन्हा एकदा ते कामाख्या देवीच्या दर्शनाला जात आहेत. दोन दिवसापूर्वी शिंदेंनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले आहे.