उद्धव ठाकरे आता काकांना गद्दार म्हणणार का? शिंदे गटातील नेत्याचा ठाकरेंना टोला
![Sheetal Mhatre said that Uddhav Thackeray will now call his uncle a traitor](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/sharad-pawar-and-uddhav-thackeray-780x470.jpg)
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा
मुंबई : नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत कोहिमाममध्ये झालेल्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावरून शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.
काका म्हणाले “भाजप विरोधात सर्व विरोधी पक्षांना एकत्रित करणार!” आणि युतीकरुन इकडे नागालॅंडमध्ये सत्तेत येतात… उबाठा गट आता काकांना गद्दार म्हणणार का?, असं शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केलं आहे.
नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला पाठिंबा
नागालँडमध्ये एनडीपी आणि भाजपा आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. या दोन्ही पक्षानं नागालँडमध्ये सरकार स्थापन केलं आहे. निफियू रिओ हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा मिळाल्या आहेत. सात जागांसह राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी सत्तेत जाण्याचा आग्रह धरला. यावर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली. आज सकाळी नागालँडचे प्रभारी नरेंद्र वर्मा यांनी शरद पवारांनी भेट घेतली. या भेटीत स्थानिक नेत्यांच्या मागणीवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादीने नागालँड सरकराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.