Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

मोठी बातमी! जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पद सोडलं; शशिकांत शिंदे नवे प्रदेशाध्यक्ष!

Shashikant Shinde | राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात मोठा बदल घडला असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता आमदार शशिकांत शिंदे यांची पक्षाच्या नव्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शशिकांत शिंदे मंगळवार, १५ जुलै २०२५ पासून आपला पदभार सांभाळणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून जयंत पाटील प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होण्याची चर्चा पक्षात सुरू होती. पक्षाच्या २६व्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज व्यक्त करत आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली होती. या विनंतीला मान्यता देत शरद पवार यांनी सामूहिक निर्णय घेत शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला.

हेही वाचा     :        शिंदे मुख्यमंत्रीपदासाठी भाजपमध्ये विलीनीकरणास तयार; संजय राऊतांचा मोठा दावा

आमदार शशिकांत शिंदे हे सातारा आणि नवी मुंबईत राजकीय प्रभाव असलेले धाडसी नेते म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या कठीण काळात शरद पवार यांच्यासोबत राहून त्यांनी पक्षाची पडझड थांबवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शिंदे यांनी जावलीसारखा सुरक्षित मतदारसंघ सोडून कोरेगावमधून निवडणूक लढवली आणि विजय मिळवला, ज्यामुळे त्यांना ‘राष्ट्रवादीची मुलुखमैदान तोफ’ अशी उपमा मिळाली आहे.

जयंत पाटील यांनी गेल्या दहा वर्षांपासून पक्षाच्या संघटनात्मक कामात मोलाचे योगदान दिले. त्यांनी आपल्या कार्यकाळात पक्षाला मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मात्र, नव्या पिढीला संधी देण्याच्या उद्देशाने त्यांनी स्वत:हून पायउतार होण्याचा निर्णय घेतला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button