राहुल गांधींचे मूळ आडनाव हे खान आहे का? शरद पोंक्षेंचा सवाल
मुंबई : मराठी अभिनेते शरद पोंक्षे आपल्या वक्तव्यामुळे सतत चर्चेत असतात. दरम्यान त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात थेट काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. राहुल गांधींचे मूळ आडनाव हे खान आहे का? असा सवाल शरद पोंक्षे यांनी उपस्थित केला.
शरद पोंक्षे म्हणाले, एक तर तू गांधी नाही अन् सावरकर पण नाही… हे काही ओरिजनल गांधी नसून तर खान आहेत… महात्मा गांधीचे वंशज नाही, तर त्यांच्या आडनावाचा फायदा यांनी घेतला, फिरोज खान यांची पुढची ही पिलावळ असल्याचा यांचा इतिहास असल्याचा आरोप शरद पोंक्षे यांनी केला.
हेही वाचा – ‘जे खोके-खोके ओरडत आहेत ना त्यांच्याकडे कंटेनर’; राज ठाकरेंचा महाविकास आघाडीला टोला
या मुर्खांना यांच्या आजीचा इतिहास माहीत नाही तर यांना सावरकरांचा कसा माहित असणार? अशी टिका शरद पोंक्षे यांनी आपल्या व्याख्यानात केली. राफेल प्रकरणात सुद्धा त्यांनी सुप्रिम कोर्टात माफी मागितली. जोपर्यंत अपिल करण्याची संधी आहे, तोपर्यंत हे कोर्टात माफी मागत असतात. सावरकर प्रकरणात हेच झाले, असंही शरद पोंक्षे म्हणाले.