breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

उद्धव ठाकरेंसोबत काय चर्चा झाली? शरद पवार म्हणाले,..

पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली. या सव्वा तास चाललेल्या बैठकीत नेमती काय चर्चा झाली यावर स्वत: शरद पवारांनी माध्यामांना प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, काही प्रश्नांबद्दल वेगळी मतं असली तरी आम्ही एकत्र काम करतो. महाविकास आघाडीमध्ये असलेल्या पक्षांनी एका विचाराने काम करावे यासाठी काही कार्यक्रम आखण्यात आले आहेत. त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, हे धोरण आमच्या कालच्या बैठकीत ठरले आहे.

राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा सध्या होत आहेत. १६ एप्रिल रोजी नागपुरची सभा आहे. सभांमधून आघाडीची एकसंध भूमिका जनतेपुढे जायला हवी. आघाडीत मतभिन्नता निर्माण होणारे वादग्रस्त विषय टाळायला हवेत, यावर चर्चा झाली. सावरकर आणि अदानी या दोन मुद्यांवर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रावादी व शिवसेनेची भूमिका वेगळी आहे. हे मुद्दे सलोख्याने मार्गी लागावेत आणि नाहक आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण होऊ नये या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. काँग्रेस नेत्यांच्या आगळिकीबद्दल चर्चा झाली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button