breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘मोदींचे हात बळकट करण्यासाठी ऊस तोडणी कामगारांचा मुलगा लोकसभेत पाठवा’; समाधान दादा आवताडे यांचं आवाहन

सोलापुर : आगामी लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्या अनुषंगाने आता राज्यात निवडणुकीच्या प्रचाराला प्रचंड वेग आला आहे. यातच  सोलापुर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार भाजप आमदार राम सातपुते निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापुर मतदारसंघातील अनेक ठिकाणी जाऊन भेटीगाठी घेत आहेत. ‘निर्धार सोलापुरात पुन्हा कमळ फुलविण्याचा’ ही टॅगलाईन घेऊन सातपुते यांचा जोरदार प्रचार सुरू झाला आहे. यातच आज राम सातपुते यांनी पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आवताडे यांनी राम सातपुते यांना विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्यात.

हेही वाचा – ‘वर्षा’वर सलग दुसऱ्या दिवशी मध्यरात्री बैठकांचे सत्र

महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ समाधान दादा अवताडे यांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी पंढरपुर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा मांडतांना त्यांनी जनतेला मोठे आवाहन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि ऊस तोडणी कामगारांचा मुलगा जनतेच्या सेवेसाठी लोकसभेत पाठवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कामाला लागा असे आवाहनच समाधान दादा अवताडे यांनी जनतेला केले.

राम सातपुते यांनी समाधान दादा आवताडे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच राम सातपुते यांना निवडून देण्यासाठी आपण सर्वांनी विजयासाठी जोमाने काम करू, असा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा सरचिटणीस शशीकांतजी चव्हाण, निवडणूक प्रमुख राजेंद्रजी सुरवसे, युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदर्शनजी यादव, सुशांतजी हजारे, अंबादासजी कुलकर्णी, सुनील रत्नपारखी, आदित्यजी हिंदुस्थानी होते. तसेच भाजपसह महायुतीतील अनेक मित्र पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button