ताज्या घडामोडीराजकारणसातारा

उदयराजेंकडून शशिकांत शिंदे यांचा पराभव

साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी मुसंडी मारली

सातारा : लोकसभा मतदारसंघा भारतीय जनता पक्षाकडून छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शशिकांत शिंदे मैदानात होते. एक्झिट पोलमध्ये उदयनराजे भोसले यांचा पराभव होईल असा दावा केला जात होता. पण तो चुकीचा ठरला. मतमोजणी सुरु झाल्यापासून दोघांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत होती. त्यामुळे विजयी कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. आता उदयनराजे भोसले यांनी गेल्या निवडणुकीत वचपा काढला आहे. त्यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव करत विजय मिळवला आहे. अखेर साताऱ्यात उदयनराजे भोसले यांनी मुसंडी मारली आहे.

सातारा लोकसभेसाठी तिकीट मागत असताना आपण येथून विजयी होणारच असं उदयनराजे भोसले यांनी विश्वास व्यक्त केला होता. पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून राजेंंनी दिल्लीत मुक्काम ठोकावा होता. मावळते खासदार श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढण्यास नकार दिल्याने शरद पवार गटापुढे कोणाला उमेवारी द्यावी म्हणून संभ्रम होता. त्यानंतर त्यांनी शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली होती.

कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांना तिकीट जाहीर झाल्यानंतर कांटे की टक्कर होईल असं कोणाला वाटलं नव्हतं. एक्झिट पोलमध्येही उदयनराजे भोसले पराभूत होईल अशीच शक्यता वर्तवली गेली होती. पण आता भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचा विजय निश्चित झाला आहे. या हायहोल्टेज लढतीत अखेर उदयनराजे भोसले यांनी बाजी मारली आहे. साताऱ्याचा गड राखण्यात त्यांना यश मिळाले आहे.

कराड दक्षिण मतदारसंघात उदयनराजे यांना अधिकच मताधिक्य मिळाले असून विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्याचं आत्मचिंतन करावं असं सातारा लोकसभेचे भाजपचे प्रभारी डॉ अतुल भोसले यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.

पहिली फेरीत – उदयराजे भोसले २७ हजार ५५६ मते, शशिकांत शिंदे यांना २७ हजार ५०७ मते दुसऱ्या फेरीत – उदयनराजे यांना ५३ हजार ३०४ मते, शशिकांत शिंदे यांना ५७ हजार ७४६ मते तिसऱ्या फेरीत – उदयनराजे यांना ७४ हजार ३१० मते, शशिकांत शिंदे यांना ८२ हजार ९४६ मते चौथ्या फेरीत उदयनराजे यांना ९९ हजार २७३ मते, शशिकांत शिंदे यांना १ लाख १२ हजार ४७५ मते पाचव्या फेरीत उदयनराजे यांना १ लाख २८ हजार ३७५मते, शशिकांत शिंदे यांना १ लाख ४१ हजार ८२ मते

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button