‘पहिली लाथ संजय राऊतच्या ढुंगणावर मारली पाहिजे’; शिंदे गटातील आमदाराचं राऊतांना प्रत्युत्तर
![Sanjay Shirsat said that the first kick should be hit on the stump of Sanjay Raut](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/sanjay-raut-1-780x470.jpg)
मुंबई : भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यानंतर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका करत चंद्रकांत पाटील आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. संजय राऊतांच्या टीकेला शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले की, काल जो प्रकार झाला त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मुळात बाबरीचं पतन झालं तेव्हा तिथे हजारो हिंदू होते. तिथे रामल्लांचं मंदिर बांधायचं आहे, या एकाच विचाराने सर्वजण एकत्र आले होते. तिथे कोण होते, कोण नव्हते यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही. चंद्रकांत पाटलांच्या माफीनंतर तो विषय संपवा आहे. पण दुसऱ्या दिवशी संजय राऊत म्हणाले त्यांच्या ढुंगणावर लाथ मारा, त्यावर मी म्हणेन की, पहिली लाथ ही संजय राऊतच्या ढुंगणावर मारली पाहिजे.
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी गद्दारी करणार पहिला कोण होता तर तो संजय राऊत होता. त्याने पक्षात फूट पाडली, त्याने भाजपासोबतची युती तोडली आणि आघाडी करायला लावली, त्यामुळे पहिली लाथ ही त्याच्या ढुंगणावर मारली पाहिजे, असंही संजय शिरसाट म्हणाले.