breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मुख्यमंत्र्यांनी भलत्याच माणसाला फासावर लटकवलं असावं’; संजय राऊतांकडून पोलखोल

मुंबई | बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेचे राज्यभर पडसाद उमटू लागले आहेत. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. चार महिन्यांपूर्वी राज्यात अशीच एक बलात्काराची घटना घडली. मात्र आम्ही त्याप्रकरणी फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून दोन महिन्यात गुन्हेगाराला फाशीची शिक्षा दिली, असा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बदलापूर प्रकरणानंतर केलेल्या एका वक्तव्याची व्हिडीओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यात ते सांगत आहेत की दोन चार महिन्यापूर्वी महाराष्ट्रात अशीच एक घटना घडली, पण आम्ही ते प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवलं. दोन महिन्यांपूर्वी त्या आरोपीला फाशीची शिक्षा ठोठावली. यासंदर्भात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे यांचा व्हिडीओ शेअर केला आहे.

हेही वाचा    –      सोन्याच्या किंमतीत वाढ! जाणून घ्या सोने व चांदीच्या किंमती

माझा एकनाथ शिंदेंना प्रश्न आहे की नेमकं हे प्रकरण कोणत्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलं होतं ते त्यांनी जाहीर करावं. कोणत्या न्यायालयासमोर हा खटला चालवण्यात आला? कोणत्या न्यायालयाने संबंधित आरोपीला फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली? कोणत्या कारागृहात संबंधित आरोपीला फाशी देण्यात आली? याबाबतचा तपशील शिंदेंनी जाहीर करावा. तसेच तुम्ही महाराष्ट्रापासून काही लपवलं आहे का ते सांगा. तुम्ही कुठल्या भलत्याच माणसाला फासावर लटकवलं आहे का ते स्पष्ट करावं, असं संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी फाशीची जागा देखील सांगावी. त्यांनी वर्षा बंगल्याच्या मागे किंवा राजभवनाच्या मागे कोणाला फाशी दिली आहे का? ते स्पष्ट करावं. एखाद्या राज्यात कोणत्याही गुन्हेगाराला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राजभवनात त्याबाबतची नोंद करावी लागते. राज्यपालांनी आदेश काढावा लागतो. त्यामुळे त्याची नोंद देखील जाहीर करावी. यासह माझं राज्यपालांना आवाहन आहे की मुख्यमंत्र्यांनी केलेलं वक्तव्य गंभीर आहे. त्याची त्यांनी दखल घ्यावी. या सरकारने परस्पर कोणाला फाशी दिली आहे का याची चौकशी करावी. तसेच तुमच्याकडे याबाबतची काही नोंद असेल तर ती महाराष्ट्रसमोर जाहीर करावी, असंही संजय राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

विरोधक म्हणत होते की या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना नको, सुरक्षित बहीण योजना हवी. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो की तीन-चार महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात माझ्या एका बहिणीबरोबर अशीच एक घटना घडली. आम्ही तो खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवला. पीडितेची बाजू मांडण्यासाठी विशेष वकील व पुरावे दिले, पोलिसांनी भक्कम खटला उभा केला, खूप मेहनत केली. त्यानंतर दोन महिन्यांनी त्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button