breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते’; संजय राऊतांचा मोठा दावा

मुंबई | शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर मोठा हल्ला केला आहे. मनी लॅड्रींग कायद्याचा संदर्भ देत त्यांनी एकनाथ शिंदे यांना अटक होऊ शकते, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, माझ्याकडे महाराष्ट्रातील एका खासदाराचा भयंकर असा व्हिडिओ आला आहे. शिंदे गटाचे हे खासदार आहेत. ते सतत परदेशात जात असतात. ते परदेशात का जातात? हे आता हळूहळू बाहेर येत आहे. यांचा खर्च कोण करतं? हेही बाहेर येईल. शिंदे गँगचे खरे चरित्र बाहेर आल्यानंतर एकेदिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह स्वतःच जाहीर करतील की, आमचा यांच्याशी काही संबंध नाही. आमची चूक झाली.

खासदार श्रीकांत शिंदे हे महाराष्ट्राचे बाळराजे आहेत. त्यांचा वाढदिवस संबंध महाराष्ट्रात साजरा केला गेला. आमच्याही त्यांना शुभेच्छा आहेत. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एका व्यक्तीने भेट घेतल्याचे छायाचित्र मी प्रसिद्ध केले. त्या छायाचित्रातील महाशय कोण आहेत? हे पुणे पोलिसांनी जाहीर करावे. या महाशयांवर बाळराजेंनी आगामी निवडणुकीत काय जबाबदारी दिली आहे? हे समोर आणावे, असं संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा    –    आमदार गणपत गायकवाडांना १४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी

पीएमएलए कायद्याचा गैरवापर केला जात आहे. दोन पाच लाखांसाठी विरोधी पक्षातील लोकांना अटक करून तुरुंगात टाकण्यात येतं. मी स्वतः या कायद्याचा बळी ठरलो. मला काही दिवस तुरुंगात धाडण्यात आलं. अनिल देशमुख, नवाब मलिक यांनाही तुरुंगात टाकण्यात आलं. आता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लालू प्रसाद यादव यांच्यावर कारवाई सुरू आहे. आपच्या अनेक मंत्र्यांना तुरुंगात टाकलं आहे. भाजपाकडून पीएमएलए कायद्याचा गैरवापर होत आहे. गुन्हेगारी स्वरुपाचा पैसा किंवा त्यातून निर्माण झालेला पैसा कुणी स्वीकारला असेल तर त्या मनी लाँड्रिग प्रकरणात संबंधित व्यक्तीला अटक झाली पाहीजे, असं संजय राऊत म्हणाले.

उल्हासनगर गोळीबार प्रकरणी तुरुंगात असलेले भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी भाष्य केल्यानुसार त्यांचे कोट्यवधी रुपये मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पडून आहेत. हा आकडा १०० कोटींच्या वर असल्याचे सांगितलं जाते. मग याचा शोध ईडी घेणार का? गुन्हेगारी स्वरुपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांनी स्वीकारला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहीजे, असं संजय राऊत म्हणाले.

पीएमएलए कायद्यात एखाद्या व्यक्तीचे भाष्य हाच पुरावा मानला जातो. आमच्यावरही भाजपा नेत्यांच्या भाष्यावरच कारवाई करण्यात आली. मग भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी स्वतःच याची कबुली दिली असेल तर तोच पुरावा मानला जावा. एरवी विरोधकांविरोधात तात्काळ करणारे ईडी, प्राप्तीकर विभागाचे अधिकारी आता कुठे आहेत? आर्थिक गुन्हे शाखा, सीबीआय, गृहमंत्रालय आता कुठे आहेत? ते फक्त विरोधकांसाठीच आहे का? एफआयआर झाल्याशिवाय ईडी कोणत्याही प्रकरणात पडत नाही. गणपत गायकवाड प्रकरणात एफआयआर झालेला आहे. त्याच एफआयआरचा वापर करून ईडी कारवाई करू शकते, असेही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button