breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘छगन भुजबळ कलाकार तर शरद पवार मोठे..’; संजय राऊतांचं विधान चर्चेत

मुंबई | अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली. पवारांनी भेटण्यास नकार देऊनही ते तासभर तिथेच बसून राहिले आणि त्यानंतर त्यांची भेट होताच तब्बल दीड तास भुजबळ-पवार यांच्यात बैठक झाली. या भेटीचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटले आहेत. यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत म्हणाले, छगन भुजबळ मोठे कलाकार आहेत. त्यांनी चित्रपटातही काम केले आहे. खूपवेळा आपले रंग रुप बदलून नाट्य निर्मिती करण्यात ते तरबेज आहेत. भुजबळ अचानक शरद पवारांकडे कसे गेले? त्यानंतर राज्याच्या राजकारणात हंगामा झाला, हे सर्वांना माहीत आहेच. पण शरद पवार सर्वात मोठे नटसम्राट आहेत. त्यांना राज्य आणि देशाच्या राजकारणात मोठी प्रतिष्ठा आहे. त्यामुळे पुढे काय होईल, हे सर्वांनी पाहावे. महाराष्ट्रात एक फिरता रंगमंच होता. छगन भुजबळ सारखे लोक याच फिरता रंगमंचाचे कलाकार आहेत. ते इकडून तिकडे फिरत असतात.

हेही वाचा      –      राज्यात पुढील १२ तासांसाठी मुसळधार पावसाचा हाय अलर्ट, मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा 

लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुती सरकारने नवनव्या योजना आणण्यास सुरुवात केली आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, छोटा भाऊ, मोठा भाऊ हे सर्व आता त्यांना आठवायला लागले आहे. विरोधकांनी या योजनांवर टीका केलेली नाही. सरकारी पैशांचे वाटप आणि त्यामाध्यमातून निवडणुकीचे जे राजकारण सुरू आहे, त्यावर विरोधक प्रश्न उपस्थित करत आहेत. महाराष्ट्रावर आठ लाख कोटींचे कर्ज असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच लाडक्या बहिणीला १० हजार देण्यात यावे, असं संजय राऊत म्हणाले.

लाडक्या बारावी पास बेरोजगार भावाला महिना सहा हजार रुपयांचा भत्ता दिला जाणार आहे. पदवीधर बेरोजगाराला दहा हजार भत्ता मिळणार आहे. पण लाडकी बहिण खऱ्या अर्थाने घर चालवते. मग लाडक्या बहिणीला फक्त १५०० रुपये का? आमची अशी मागणी आहे की, लाडक्या बहिणीलाही दहा हजार रुपये मिळायला हवेत. तेव्हाच घर चालू शकेल आणि शेतकरी, बेरोजगारांच्या आत्महत्या थांबतील, असंही संजय राऊत म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button