Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘अजित पवारांशी युती म्हणजे भाजपाशी हातमिळवणी’; राष्ट्रवादीच्या संभाव्य युतीला संजय राऊतांचा विरोध

भाजपाचा पराभव अजित पवार कसे करणार? संजय राऊतांचा सवाल

मुंबई | पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये युतीबाबत चर्चा सुरू आहेत. पुण्यात युतीसाठी अजित पवार गटाकडून प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली होती. पिंपरी-चिंचवडमध्येही युतीसाठी हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका मांडली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही गटांच्या संभाव्य युतीवर खासदार संजय राऊत यांनी तीव्र टीका केली आहे. अजित पवार हे भाजपाच्या युतीमध्ये आहेत किंवा त्यांच्या पालखीचे भोई आहेत, ते त्यांचा पराभव करू शकत नाहीत. हे तर्काला धरून नाही. अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी भाजपाचा पराभव करण्याचा विचार मनात जरी आणला तरी ते तुरुंगात जातील. हे अमित शाहांचे पक्ष आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

हेही वाचा      :          काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा आमदारकीचा राजीनामा, भाजपमध्ये जाणार?

अजित पवारांशी युती करणे हे भाजपाशी हातमिळवणी केल्यासारखे आहे. अजित पवार हे भाजपाचे हस्तक आहेत. अजित पवारांशी कोणत्याही प्रकारे युती करणे, हे एकप्रकारे भाजपाचे हात बळकट करण्यासारखे आहे. काहीही झाले तरी अजित पवार हे अमित शाह आणि भाजपाच्या पाठिशी उभे राहतील, ही त्यांची व्यक्तिगत आणि कौटुंबिक अडचण आहे. ते स्वतःची आणि कुटुंबाची कातडी वाचविण्यासाठी भाजपामध्ये गेलेले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत आज शरद पवार यांची भेट घेणार आहेत. या भेटीबाबत माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, बरेच दिवस शरद पवारांची भेट झालेली नव्हती. आजारी असताना त्यांनी बऱ्याच वेळा फोन केला होता. त्यामुळे त्यांची आज भेट घेत आहे. पण सध्या सुरू असलेल्या राजकीय विषयांवरही त्यांच्याशी चर्चा होईल, असेही ते म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button