breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“संजय राऊत पवारांनी देलेल्या अजेंड्यावर काम करतायत, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री…”; चंद्रकांत पाटलांचा दावा

मुंबई |

शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. संजय राऊत विरुद्ध भाजपा असा वाद सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याचा पुन:उल्लेख करत संजय राऊत हे पवारांसाठी काम करत असल्याची टीका केलीय. राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना थेट मुख्यमंत्री पदावर बसवता येणार नसल्याने संजय राऊतांना मुख्यमंत्री पदापर्यंत नेण्यासाठीचा राष्ट्रवादीचा अजेंडा असल्याचं आपल्याला वाटतं आणि तेच आपण बोलून दाखवल्याचं पुण्यामध्ये चंद्रकांत पाटील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हणाले.

  • उद्धव ठाकरे आमचे एकतर्फी मित्र…

चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख मित्र असा केला. “उद्धवजी काहीही झालं तरी आमचे मित्र आहेत. ते मानोत न मानोत काहीही झालं तरी एकतर्फी मैत्री आहे. हिंदूहृदयसम्राट बहाळासाहेब ठाकरेंचे ते चिरंजीव आहेत. अनेक वर्ष आम्ही एकत्र काम केलंय. कोण संजय राऊत ओ? काल परवा आले शिवसेनेत आणि ते कोणाला शिकवताय?,” असा टोला त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना लगावला.

  • मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम…

“आम्ही उद्धवजींना एवढं म्हटलं की आम्हाला जे आकलन आहे त्यानुसार संजय राऊत पवारसाहेबांनी देलेल्या अजेंड्यावर काम करतायत. जो अजेंडा तुम्हाला अडीच वर्ष होत आल्याने मुख्यमंत्री पदावरुन घालवणे. डायरेक्ट सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करु शकत नाहीत. ते हे सगळं मान्य करणार नाहीत. संजय राऊत (मुख्यमंत्री) झाले तरी त्यांना सुप्रियाताई झाल्यासारखं आहे. मातोश्रीचा पाया उखडण्याचं काम चाललेलं आहे, हे मला वाटलं ते मी म्हटलं. आता तुम्ही माझ्या म्हणण्यावर बंदी आणणार का?,” असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी विचारला.

  • आशावादावर चालतात…

गोवा आणि उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना निवडणूक लढणार असल्याच्या प्रश्नावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी, “गोव्यामध्ये ७४३ मतं मिळाली शिवसेनेला गेल्या वेळेला. तरी त्यांचा यावेळी असा दावा केलाय की आमच्याशिवाय सरकार येणार नाही,” असा शाब्दिक चिमटा काढला. पुढे बोलताना, “उत्तर प्रदेशमध्ये तर दरवेळी डिपॉझीट जप्त होतं. त्यामुळे लोकशाहीमध्ये प्रयत्न करायला हरकत नाही. आशावादावर ते चालतात,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

  • संजय राऊतांना सल्ला देण्याचं धाडस…

चंद्रकांत पाटलांनी आम्हाला शिकवण्याची गरज नाही. त्यांचा पक्ष आता झिजतोय त्याकडे त्यांनी लक्ष द्यावं अशी टीका संजय राऊतांनी केल्याचं सांगत पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला. तुम्ही म्हणालेला की मुख्यमंत्र्यांनी संजय राऊतांना आवारावं, यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिल्याचं पत्रकारांनी सांगितलं. या प्रश्नावर उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी, “मी संजय राऊतांना सल्ला दिलेला नाही. त्यांना सल्ला देण्याचं धाडस परमेश्वरही करणार नाही,” असं उत्तर दिलं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button