पत्रकार परिषदेच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा; संदीप देशपांडे यांचा राऊतांना सल्ला
![Sandeep Deshpande said that do yoga 10 to 15 minutes before the press conference](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/sanjay-raut-and-sandip-deshpande-780x470.jpg)
काही दिवसांनी पवार..पवार ओरडत फिरायची पाळी येईल
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मागील दोन दिवसांत भाजपा-शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना एक पत्र लिहलं आहे. पत्रकार परिषदेपूर्वी राऊतांनी योगा करावा, असा सल्ला त्यांनी राऊतांना या पत्राद्वारे दिला आहे.
तुमच्याबद्दल वाटणाऱ्या काळजीपोटी हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेत स्तर खालावला आहे. आपली चीडचीड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करती आहात. आपल्या मनाविरूद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चीडचीड व्हायला लागते. कधी कधी नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. तुम्ही कितीही नाकारलं तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
आपण रोज जी पत्रकार परिषद घेता, त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या, मग हळू हळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का? ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषदेच्या १० ते १५ मिनिटे पूर्वी योगा करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल, असा सल्ला संदीप देशपांडे यांनी संजय राऊतांना दिला आहे.
सर्वात महत्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना पवार साहेबांच्या नागी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली, ही सल मानला लावून घेतली आहे. ती पहिले आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या ऱ्हासाला जबाबदार नाहीत. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेही तेवढेच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्या, नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार..पवार असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल, असंही संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.