Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

रूपाली चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत होत्या; सुषमा अंधारेंचे धक्कादायक आरोप

मुंबई | कॅप्टन अशोक खरात प्रकरणात नवे वादंग उभे राहत असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. चाकणकर स्वतः तंत्रविद्या करत असल्याचा धक्कादायक दावा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

नाशिक जिल्ह्यातील महिलांवरील अत्याचार प्रकरणात आरोपी अशोक खरात याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात पुढे आणखी अनेक गोष्टींचा उलगडा होणार असून त्यावर योग्य ती कारवाई होणे गरजेचे असल्याचे सुषमा अंधारे यांनी सांगितले.

हेही वाचा      :              रूपाली चाकणकर फरार; रूपाली पाटील ठोंबरेंच्या पोस्टने खळबळ

सुषमा अंधारे यांनी चाकणकर आणि खरात यांच्यातील संबंधांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरातांचे वडील वारल्यानंतर चाकणकर तेथे उपस्थित होत्या. खरातांची भाची चाकणकरांच्या घरी राहत होती. तसेच दोघांमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची कागदपत्रे माझ्याकडे असून ती दोन दिवसांत सादर करेन, असा दावा त्यांनी केला.

पीडितेच्या तक्रारीचा हवाला देत अंधारे म्हणाल्या की, चाकणकर तंत्रविद्या करत होत्या आणि सोमवती अमावस्येला काही विशिष्ट प्रक्रिया करत असल्याचे आरोप आहेत. यासंदर्भातील काही छायाचित्रेही त्यांनी पत्रकार परिषदेत दाखवली.

दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले असून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी चाकणकर यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांना अटक करून समोरासमोर चौकशी करावी आणि नार्को टेस्ट घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button