Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
रोशनी शिंदे मारहाण प्रकरणाची महिला आयोगाने घेतली दखल
ठाणे पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश
![Roshni Shinde assault case was taken cognizance of by Women's Commission](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/rupali-chakankar-and-Roshni-Shinde-780x470.jpg)
मुंबई : रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. दुखापत झालेल्या रोशनी शिंदे यांना ठाण्यातील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काल त्यांना लीलावती रूग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. ठाणे पोलिसांना तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रोशनी शिंदे यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. ठाण्यातील घोडबंदर रोड परिसरातील कासारवजवली भागात रोशनी शिंदे यांचं कार्यालय आहे. तिथून सोमवारी संध्याकाळी घरी निघत असताना शिंदे गटाच्या १५ ते २० महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे.