breaking-newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

भारत २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचा संकल्प : पंतप्रधान नरेंद्र मोदी

‘मन की बात’ कार्यक्रमात साधला पिंपरी-चिंचवडकरांशी संवाद

पिंपरी : शतकानुशतकं आपल्या भारतीय जीवनशैलीचा अविभाज्य घटक राहिलेल्या योगाभ्यास आणि आयुर्वेद या आपल्या शास्त्रांसमोर मात्र पुराव्यावर आधारीत संशोधनाचा अभाव, हे नेहमीचच एक आव्हान राहिलं आहे. ‘सबका प्रयास’ च्या या भावनेतूनच आपण 2025 सालापर्यंत भारताला क्षयरोग मुक्त करण्यासाठी काम करत आहोत, असा संकल्प देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.
‘‘मन की बात’’ या प्रसिद्ध कार्यक्रमाच्या माध्यमातून आज पिंपरी-चिंचवडमधील विविध क्षेत्रातील नागरिकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, उषा उर्फ माई ढोरे, सदाशिव खाडे, नानी घुले, नितीन लांडगे, राजेश पिल्ले, शंकर जगताप, हेमंतराव हरहरे, नितीन काळजे, राहुल जाधव, अमोल थोरात, राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, अमित गोरखे, नंदकुमार दाभाडे, चंद्रकांत नखाते, शत्रुघ्न काटे, संदिप कस्पटे, हर्षल ढोरे, संतोष कलाटे आदी उपस्थित होते.
ऑटो क्लस्टर सभागृहात हा कार्यक्रम झाला. त्यासाठी शहरातील विविध क्षेत्रातील नागरिकांना निमंत्रित केले होते. नागरिकांनी पंतप्रधानांशी संवादही साधला.
‘मन की बात’ कार्यक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक अमित गोरखे म्हणाले की, ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड शहराची निवड करण्यात आली. पंतप्रधानांचा ‘मन की बात’ कार्यक्रम जनमानसात प्रचंड प्रसिद्ध असून, दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम देशभरात प्रसिद्ध होत असतो. यामध्ये देशातील विविध क्षेत्रातील नागरीक सहभागी होत असतात. प्रत्येकी राज्यातील एखादे शहर लाईव्ह स्ट्रिमिंगद्वारे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत असते.

अटल बिहारी वाजपेयी यांना प्रत्येकाच्या हृदयात स्थान : पंतप्रधान

आपली परंपरा आणि संस्कृती यांचं माता गंगेशी अतूट नातं, गंगाजल आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. संयुक्‍त राष्ट्रांनी ‘नमामि गंगे’ अभियानाचा समावेश हा पर्यावरणाचा पुनर्संचय करणाऱ्या जगातील पहिल्या दहा उपक्रमांमध्ये केला आहे. तसेच, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देशाला असामान्य नेतृत्व देणारे महान राजकीय नेते होते. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात त्यांना विशेष स्थान आहे. पायाभूत सुविधा, शिक्षण किंवा परराष्ट्र धोरण, त्यांनी प्रत्येक क्षेत्रात भारताला नव्या उंचीवर नेले, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या.

नागरिकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया :

शुभांगी होळकर म्हणाल्या की, पंतप्रधान मोदी यांनी कोविड काळात संपूर्ण देशातील गरजू नागरिकांना मोफत अन्नधान्य उपलब्ध करुन दिले. माझे पती यांचीही नोकरी गेली होती. मोदींनी आता पुन्हा पाच वर्षांसाठी मोफत अन्नधान्य योजना आणली आणली आहे. याचा फायदा देशातील गोरगरीब नागरिकांना होणार आहे.

पौर्णिमा दिंडे म्हणाल्या की, माझे वडील कॅन्सरमुळे मृत्यूमुखी पडले. मात्र, योगासनांमुळे कॅन्सरसारख्या आजारावर मात करता येते, याची माहिती मिळाली. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली आरोग्य क्षेत्रात चांगले काम सुरू आहे.

तुळसा हक्के म्हणाल्या की, महाराष्ट्रातील विषेशत: पालघर जिल्ह्यातील आदिवासी समाज आहे. त्या आदिवासी समाजाची माहिती देताना त्यांनी घरगुती उद्योगांना प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाला मदत झाली, इतकी सूक्ष्म माहिती पंतप्रधान मोदी यांनी ‘मन की बात’मधून मिळाली. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळाले.

डॉ. प्रताप सोमवंशी म्हणाले की, स्तनाच्या कर्करोगाबाबत योगाचे महत्व पुराव्यानिशी सिद्ध झाले आहे. त्याप्रमाणे आयुर्वेदातील ज्ञानाचा पुराव्याधारित अभ्यास झाला, तर ॲलोपॅथीप्रमाणे जगभरात आयुर्वेदाचाही प्रचार-प्रसार होईल, असा सूचना मी ‘मन की बात’ मध्ये केली आहे. तसेच, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. प्रमोद कुबडे, डॉ. सुभाष निकम आणि डॉ. रमेश केदार यांनीही ‘मन की बात’ मध्ये सहभाग घेतला आणि आपली निरीक्षणे नोंदवली आहे.

सरचिटणीस राजू दुर्गे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा जागतिक पटलावर प्रसिद्ध केला. योगामुळे माणूस सदृढ होतो. माणूस सदृढ झाला की, परिसर सदृढ होतो. याप्रमाणे मोदींनी भारताला सदृढ केले. जगाला योगाचे महत्व पटवून देणारे पंतप्रधान भारताला लाभले, हे आपले भाग्य आहे. त्यामुळे संपूर्ण देश मोदींच्या विचारांचे अनुकरण करतो.

‘मन की बात’ कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ॲड.मोरेश्वर शेडगे यांनी तर प्रास्ताविक पश्चिम महाराष्ट्र संयोजक अमित गोरखे यांनी केले. उपस्थितीतांचे आभार पिंपरी-चिंचवड संयोजक नंदकुमार दाभाडे यांनी व्यक्त केले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button