कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांचा राजीनामा?
![Resignation of Brijbhushan Singh, President of Wrestling Federation?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/brij-bhushan-singh-780x470.jpg)
क्रीडा मंत्रालयाची कुस्ती महासंघाला नोटीस
मुंबई : लैंगिक शोषणाच्या आरोपांनंतर आता कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंग यांना चांगलीच चपराक बसली आहे. आता या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घातले आहे. भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत ब्रिजभूषण यांना नोटीस पाठवली आहे.
भारताच्या कुस्तीपटूंनी ब्रिजभूषण यांच्या अन्यायाविरोधात आंदोलन उभारले होते. या आंदोलनाला आता यश मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण क्रीडा मंत्रालयाने आता कुस्ती महासंघाला नोटीस पाठवली आहे आणि त्यांना येत्या ७२ तासांमध्ये या नोटीशीवर उत्तर द्यायला सांगितले आहे.
ब्रिजभूषण हेच या महासंघाच्या अध्यक्षपदी आहेत, त्यामुळे त्यांनाच या नोटीशीला उत्तर द्यावे लागणार आहे. त्यातबरोबर क्रीडा मंत्रालयाने यावेळी ब्रिजभूषण यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे.
धक्कादायक गोष्ट म्हणजे, महिला कुस्तीपटू विनेश फोगटने बुधवारी रडत रडत, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे अनेक वर्षांपासून महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप केला आहे. एवढेच नाही, तर त्यांना हटवण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनीही हस्तक्षेप करावा अशी मागणीही फोगटने केली आहे.
बृजभूषण सिंह यांनी आरोपांवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कुणीतरी तर समोर असेल जे सांगेल की बृजभूषण सिंहांनी अमुक एखाद्या खेळाडूनचं लैंगिक शोषण केलं आहे. विनेश स्पर्धा हरली तेव्हाही मी तिला पाठिंबा दिला. तिचं सांत्वन केलं, असं खासदार बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.