अजित पवारांना पुण्यातून आव्हान; ‘या’ नेत्याने केली मुख्यमंत्रीपदासाठी इच्छा व्यक्त
![Ravindra Dhangekar said that I also want to become Chief Minister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/ajit-pawar-4-780x470.jpg)
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्रीपदावर दावा केला. तर ठाकरे गटाकडून पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल, भाजपाने सांगितले की पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील, तर शिंदे गटातील नेत्यांनी सांगितलं आहे की पुढचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होतील. यातच आता पुण्यातील नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनीही मुख्यमंत्री व्हायची इच्छा व्यक्त केली आहे.
अजित पवार मुख्यमंत्री होण्याची इच्छेबाबत रवींद्र धंगेकरांना विचारले असता ते म्हणाले की, मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते. अजित पवार मुख्यमंत्री व्हायलाच हवेत. अजित पवार मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल. अजितदादा मोठे झालेलं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कधीही आवडेल. अजितदादा हे दादा आहेत. दादा जे बोलतात तेच करतात, असं धंगेकर म्हणाले.
पुणे लोकसभा कोणाला द्यायची हे महाविकास आघाडीचे नेते ठरवतील. पक्ष जो उमेदवार देईल तो मान्य असेल. सात वर्षापासून पुण्यात भाजपने आश्वासनाची खैरात दिली. भाजपला लोक आता मतं देणार नाहीत, असंही धंगेकर म्हणाले.