Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय
कोण रोहित पवार? काय त्यांची पात्रता? भाजप नेत्यांचा हल्लाबोल
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही गौरव यात्रा आहे
![Ravindra Chavan said who is Rohit Pawar and his qualifications](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/04/Rohit-Pawar-780x470.jpg)
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ शिवसेना आणि भाजपतर्फे सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर सावरकर गौरव यात्रेतून भाजप नेत्याने टीकास्त्र डागलं आहे.
राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी ही गौरव यात्रा आहे. कोण रोहित पवार?, काय त्याची औकात?, बोलण्याच्या औकातीचा तो माणूस नाही, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकर माहित नाही त्याला बोलण्याचा अधिकार नाही, असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
दरम्यान, गांधी हा एक विचार आहे, तो विचार संपवण्याच एका मोठ्या राजकीय पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळं हिंमत असेल तर, भोंदूंच्या आडून ट्रायल घेण्यापेक्षा त्यांनी अधिकृत भूमिका घेण्याचं धाडस दाखवावं, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं होतं.