breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

महाविकास आघाडीत बिघाडी? राहुल कलाटेंचा बंडखोरीचा इशारा

मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार

पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची जोरदार चर्चा चालू आहे. एकाकडे लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपानं उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने नाना काटे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी जाहीर केली. मात्र, आता मविआसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. कारण शिवसेना ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे यांनी बंडखोरीचा इशारा दिला आहे.

गेल्या दोन निवडणुकीत मी निकराची झुंज दिली होती. महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, मला उमेदवारी मिळू शकली नाही. त्यामुळे मी आता अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहे. मलाच मतदार सहानुभूती दाखवतील असा विश्वास आहे, असं राहुल कलाटे यांनी म्हटलं आहे.

यापुर्वी राहुल कलाटे यांनी 2014 ची विधानसभा शिवसेनेकडून तर 2019 ची विधानसभा अपक्ष उमेदवार म्हणून लढली होती. या निवडणुकीत दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना कलाटे यांनी कडवी झुंज दिली होती. त्यामुळे आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र राष्ट्रवादीच्या वतीने महापालिकेतील विरोधी पक्ष नेते नाना काटे यांना उमेदवारी जाहीर झाली.

कलाटे यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने दुरंगी होणारी निवडणूक आता तिरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button