breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

चिपळूणमध्ये राणे समर्थक-ठाकरे गटामध्ये राडा, निलेश राणेंच्या ताफ्यावर दगडफेक

चिपळून | भाजपचे नेते निलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांवर दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. निलेश राणे यांची आज गुहागरमध्ये जाहीर सभा होणार होती. या सभेला विरोध करण्यासाठी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. दरम्यान, दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी यावेळी एकमेकांवर दगडफेक केली. या दगडफेकीत अनेक वाहनांच्या काचा फुटल्या आहेत.

निलेश राणे यांचा ताफा सभास्थळी जात असताना भास्कर जाधव यांचे कार्यकर्ते आडवे आले. यावेळी भास्कर जाधव आणि निलेश राणे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांमधील हा वाद इतका वाढला की, दोन्ही गटांकडून दगडफेक आणि घोषणाबाजी सुरू झाली. जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्यादेखील फोडल्या.

हेही वाचा     –      पिंपरी-चिंचवड न्यायालय संकुलाच्या कामाचा अखेर ‘टेकऑफ’

भास्कर जाधव काय म्हणाले?

गुहागरमध्ये माझ्या विधानसभा मतदारसंघात सभा घेण्यासाठी येणार अशी जाहिरातबाजी केली होती. खूप मोठ्या प्रमाणात टिझर व्हायरल करुन लोकांना उचकावण्याचा प्रयत्न केला होता. माझ्या कार्यालयासमोर बॅनर लावले होती. हिशेब चुकते करणार, गुन्ह्याला माफी नाही असे आव्हानात्मक बॅनर लावले होते. झेंडे लावले होते. पण चिपळूणची संस्कृती आहे, कोणाच्या झेंड्याला, बॅनरला हात लावायचा नाही. आम्ही कुणीही त्यांच्या झेंड्याला हात लावला नाही. परंत सुभा गुहागरला होती. निलेश राणे मुंबईतून आले. वास्तविक पाहता त्यांनी डायरेक्ट गुहागरला जाऊन सभा घेणं आवश्यक होतं, पण ते जाणीवपूर्वक चिपळूणमध्ये आले, असं भास्कर जाधव म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button