Breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघ आगामी निवडणुकीसाठी सज्ज

पुणे | आगामी विधानसभा निवडणूक व्यवस्थितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने २१४, पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघात निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. या मतदार संघात ७३ इमारतींमध्ये २७४ मतदान केंद्र असून २ लाख ९३ हजार ४५३ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी दिली आहे.

या विधानसभा मतदार संघात एका मतदान केंद्रावर सरासरी १ हजार ७१ मतदार संख्या आहे. मतदारसंघामध्ये १ लाख ४८ हजार ५४९ पुरुष मतदार, १ लाख ४४ हजार ८७० महिला मतदार व ३४ तृतीयपंथी मतदार असे एकूण २ लाख ९३ हजार ४५३ मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी निवडणूक विभागाने आवश्यक प्रमाणात मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. पुणे कॅन्टोमेंट विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय भारतरत्न सर विश्वेश्वरैय्या हॉल, सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्र ५, ३ रा मजला, अर्सेनल प्लॉट, हॉटेल सागर प्लाझा समोर, कॅम्प, पुणे येथे स्थापन करण्यात आले आहे.

हेही वाचा    –    काही ठिकाणी लढणार, काही ठिकाणी पाडणार; मनोज जरांगेंची मोठी घोषणा

निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अधिनस्त नामनिर्देशन व्यवस्थापन, ईव्हीएम् व्यवस्थापन व यंत्रांचे वितरण, पोस्टल बॅलेट, इडीसी पथक, निवडणूक साहित्य वाटप पथक, मतदार यादी व्यवस्थापन, मतदार मदत कक्ष व तक्रार निवारण कक्ष, जनसंपर्क व प्रसिद्धी कक्ष, एक खिडकी कक्ष, स्वीप व्यवस्थापन अशा विविध पथकांचे समन्वय अधिकारी तसेच प्रत्येकी ९ फिरती पथके (एफएसटी) आणि स्थिर सर्वेक्षण पथके (एसएसटी), ३ व्हिडिओ सर्वेक्षण पथके (व्हीएसटी), २ व्हिडिओ पाहणी पथकांचा (व्हीव्हीटी) समावेश आहे.

आदर्श आचारसंहितेअंतर्गत मतदार संघातील विविध राजकिय पक्षांनी विनापरवाना लावलेली २९५ पोस्टर्स, बॅनर्स, फ्लेक्स व झेंडे यावर कारवाई करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणूक प्रक्रिया चोख पार पाडण्याच्यादृष्टीने सर्व पथकांची आवश्यक प्रशिक्षणे घेण्यात आली. मतदारसंघातील राजकीय पक्ष प्रतिनिधींची घेऊन त्यांना आदर्श आचारसंहितेचे पालन, योग्य व अचूक नामनिर्देशन अर्ज करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्वीप व्यवस्थापन कक्ष कार्यक्षमतेने कार्यरत करण्यात आला असून मतदारसंघातील सर्व मॉल्स, रहदारीची व वर्दळीची ठिकाणे, सर्व शाळा, महाविद्यालयामध्ये मतदारांकडून मतदान करण्याबाबत संकल्पपत्र भरून घेण्यात येत आहेत. पथनाटये, गीते, घोषणा यातून मतदानाचे कर्तव्य पार पाडण्याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याची माहितीही श्री. भंडारे यांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button