‘तुझी बहीण असल्याचा अभिमान वाटतो’; प्रियंका गांधींची राहुल गांधींसाठी भावूक पोस्ट
![Priyanka Gandhi said that I am proud to be your sister](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/06/Rahul-Gandhi-and-Priyanka-Gandhi-780x470.jpg)
Rahul Gandhi and Priyanka Gandhi | १८ व्या लोकसभेचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत इंडिया आघाडीने मोठी मुसंडी मारली आहे. एनडीएला बहुमत मिळालं असलं तरी इंडिया आघाडीने २३५ जागा जिंकून एनडीएसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे. या निकालात काँग्रेसने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यात पक्षाचे नेते राहुल गांधी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे म्हटले जात आहे. त्यांच्या याच कामगिरीवर काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भावनिक विधान केलंय.
प्रियंका गांधी म्हणाल्या की, तुझ्याबद्दल ते काहीही म्हणाले, तरी तू ठाम राहिलास. तुझ्या क्षमतेवर त्यांनी शंका घेतली. पण तू कार्यरत राहिलास, त्यांच्या अपप्रचाराच्या विरोधातही तू सत्यासाठी संघर्ष करत राहिलास. प्रेम, माया, करुणा या तत्त्वांवर तू लोकांची मनं जिंकत गेलास. आज तुला वेगळ्या नजरेतून पाहिले जाईल. पण आमच्यासाठी तू सदैव असाच होतास. तुझी बहीण असल्याचा मला अभिमान वाटतो.
हेही वाचा – ‘आरक्षण दिलं नाही तर विधानसभेला..’; मनोज जरांगेंचा फडणवीसांना इशारा
https://x.com/priyankagandhi/status/
सध्या देशपातळीवरील समीकरणं काय?
एनडीए आघाडी – २९४
इंडिया आघाडी – २३२
इतर – १७