Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीआंतरराष्ट्रीयताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा बनले जगातील सर्वात लोकप्रिय नेते
![Prime Minister Narendra Modi has once again become the most popular leader in the world](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/02/narendra-modi-2-780x470.jpg)
जो बायडन, ऋषी सुनक यांना टाकले मोदींनी मागे
Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते बनले आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात आलेल्या यादीत पंतप्राधान नरेंद्र मोदी ७८ टक्के जागतिक नेत्यांच्या मान्यता रेटिंगसह अव्वल स्थानावर आहेत.
सर्वात लोकप्रिय नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २०२० आणि २०२२ मध्ये मोदी लोकप्रिय यादीत पहिल्या स्थानी होते.
पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह १६ देशांच्या दिग्गज नेत्यांना मागं सोडलं आहे. पंतप्रधान मोदीना जगभरातील नेत्यांमध्ये सर्वोच्च रेटिंग मिळाले आहे.
जगातील सर्वात लोकप्रिय नेत्यांची यादी :
- नरेंद्र मोदी (भारत) – ७८ टक्के
- आंद्रेस मेनुएल लोपेज ओब्राडोर (मेक्सिको) – ६८ टक्के
- अल्बानीज (ऑस्ट्रोलिया) – ५८ टक्के
- जॉर्जिया मेलोनी (इटली) – ५२ टक्के
- लूला डी सिल्वा (ब्राझील) – ५० टक्के
- जो बायडन (अमेरिका) – ४० टक्के
- जस्टिन टुडो (कॅनडा) – ४० टक्के